bhimrao mane news : भीमराव माने यांच्या बँक खात्यातून तब्बल 41 लाख रुपये केले लंपास मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते भीमराव माने यांच्या मोबाईलवर आरटीओ ई चलन अशी लिंक पाठवून फोन हॅक करत बँक खात्यातील तब्बल 41 लाख 6 हजार 529 रुपये लंपास करत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. सदर फसवणुकीची घटना हि शुक्रवार दि. 14 नोव्हेंबर ते बुधवार दि. 18 नोव्हेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी भीमराव बाळासो माने (वय 51 रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
bhimrao mane news : भीमराव माने यांच्या बँक खात्यातून तब्बल 41 लाख रुपये केले लंपास
आरटीओ ई चलनची लिंक पाठवून मोबाईल केला हॅक : : ऑनलाईन फसवणूक.
याबाबत अधिक माहिती अशी की, भीमराव माने हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये राहतात. भीमराव माने हे मंगळवार दि. 14 नोव्हेंबर रोजी घरी असताना त्यांच्या मोबाईल नंबरवर एका अज्ञात नंबरवरून आरटीओ ई चलन असा मॅसेज आला. या मॅसेज मध्ये असलेली लिंक माने उघडल्यानंतर त्यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने हॅक केला.
यानंतर शुक्रवार ते बुधवार दि. 18 नोव्हेंबर या कालावधीत कवठेपिरान गावातील युनियन बँकेच्या खात्यातून 3 लाख 56 हजार 531 आणि ओडी खात्यातून 37 लाख 49 हजार 998 असे एकूण 41 लाख 6 हजार 529 रुपये तब्बल 27 ट्रांझॅक्शन द्वारे आयएमपीएस, एनईएफटी आणि गुगल पे द्वारे ऑनलाईन काढून घेतले.
सदरची बाब भीमराव माने यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











