jayant patil on flood : जयंत पाटलांचा पूरग्रस्तांना दिलासा

SHARE:

jayant patil on flood : जयंत पाटलांचा पूरग्रस्तांना दिलासा : सतत पडणारा पाऊस आणि कोयनेतून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे कृष्णा नदीने पाण्याचे पात्र सोडले आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावात पूरसदृश्य परिस्थिती, आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी थोडीही उसंत न कृष्णा नदीकाठच्या गावांना भेटी देत,पूराची पाहणी करीत ग्रामस्थांना दिलासा दिला. भिऊ नका, मात्र सावध रहा. काही लागले,तर मी आहे, या शब्दात त्यांनी लोकांना धीर दिला. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांशी संपर्क करीत आवश्यक ती खबरदारी घेत योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.

jayant patil on flood : जयंत पाटलांचा पूरग्रस्तांना दिलासा

आ.जयंतराव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या ताकारी, साटपेवाडी,गौंडवाडी,रेठरेहरणाक्ष,दुधारी, बिचुद,शिरटे,कोळे,नरसिंहपूर,बहे,तांबवे, बोरगाव,जुनेखेड,वाळवा,शिरगाव व मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज या गावांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधत त्या-त्या गावातील पूर परिस्थितीची माहिती घेतली आणि प्रत्यक्ष पाहणी केली.

वाळवा तालुक्यात तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. कोयना व चांदोली धरणातून विसर्ग वाढवल्याने वारणा, कृष्णा नद्यांचे पाणी पात्राबाहेर होते. प्रशासना ने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विनायक पाटील,सुस्मिता जाधव, बबनराव सावंत,अर्जुन पाटील,दादासो मोरे, जे.डी.मोरे,सुजित मोरे,धनाजी बिरमुळे,निलेश पवार,अभिजित पाटील,धैर्यशिल पाटील, देवराज देशमुख,विठ्ठल पाटील,शिवाजी पाटील,संतोष दमामे,नागेश कदम यांच्यासह त्या-त्या गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ या संपर्क दौर्‍यात सहभागी झाले होते.

पूर्वीच्या महापूरांची आठवण॥

पूर्वी 2005,2019,2021 साली वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या गावांना महापूरांची मोठा फटका बसला होता. या महा पूराच्या काळात आ.जयंतराव पाटील व त्यांच्या कुटुंबाने या गावांना रात्रंदिवस कष्ट घेत मोठा आधार दिला होता. या महापूर सदृश्य परिस्थितीत या आठवणी जाग्या झाल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *