kolhapur political news : कोल्हापूर काँग्रेसच्या पी.एन पाटील गटाचा गुरुवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

SHARE:

kolhapur political news : कोल्हापूर काँग्रेसच्या पी.एन पाटील गटाचा गुरुवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी (25 ऑगस्ट) रोजी पी. एन. पाटील गटाचा प्रवेश निश्चित झाला आहे. तथापि, करवीर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाटील गत म्हणून लढण्यावर आम्ही ठाम आहोत, असे मत जिल्हा काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांची ही भूमिका पाहता आगामी काळात करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांचा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत.

kolhapur political news : कोल्हापूर काँग्रेसच्या पी.एन पाटील गटाचा गुरुवारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

कोल्हापूर जिल्ह्यात पी. एन. पाटील गटाचा प्रभाव कायम राहिला. त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वीस वर्षे काम केले. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी लढवली. विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर पी एन पाटील गटाच्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे आर्थिक प्रश्न ऐरणीवर आले. यादरम्यान राहुल पाटील यांनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेसाठी निमंत्रित केले.

दोघांमध्ये भेट झाल्यानंतर राहुल पाटील व राजेश पाटील या बंधूंनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले त्यानुसार आता 25 ऑगस्ट रोजी अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये सडोली , तालुका करवीर येथे पक्षप्रवेश निश्चित झाला असल्याचे राहुल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, भोगावती साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून भोगावती कारखान्याला अर्थसहाय्य मिळवून ते देणार आहेत. तसेच पी. एन. पाटील गटाला राजकीय सहाय्य ते करणार आहेत. पूर्वी दिवंगत नेते विलासराव देशमुख हे पी. एन. पाटील गटाचे आधारस्तंभ होते. आता ती भूमिका अजित पवार हे निभावणार आहेत, असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नेते यांच्याकडून मदत झाली नाही का, असा प्रश्न उपस्थित केला असता राहुल पाटील म्हणाले, अशी कोणतीही परिस्थिती आली नव्हती. काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी मदत केली होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनीही भोगावती कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे यासाठीही पाठपुरावा केला होता.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *