jaysingpur crime news : उदगावामध्ये गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त : बनावट नोटा तयार करणार्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी उघडकीस आणले आहे.
jaysingpur crime news : उदगावामध्ये गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त
दानोळीच तरूण ताब्यात
गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणार्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी 68 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बनावट नोटा प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सहभागी असल्याची समोर आली. त्यानंतर पोलीस इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जनावरांच्या गोठ्यामध्ये 68 हजार 400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यामध्ये इचलकरंजी, दानोळी येथील तरुणांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू केला असून यामध्ये मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











