jaysingpur political news : जयसिंगपुरात प्रस्थापितांबाबत नाराजी

SHARE:

अजित पवार

jaysingpur political news : जयसिंगपुरात प्रस्थापितांबाबत नाराजी : प्रभागातील विविध विषयांसंदर्भात प्रस्थापितांना काळजीच नसल्याबाबत मतदारातून नाराजी व्यक्त होत आहे. प्रस्थापितांनी या निवडणुकीपासून अलिप्त रहावे. नवख्या आणि नव्या उमेदीच्या उमेदवारांना संधी द्यावी. अशी मागणी
जयसिंगपूर शहरात जोर धरू लागली आहे. यामुळे पालिकेच्या राजकारणात नवीन उलथापालत होणार काय? अशी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. ही मागणी जोर धरू लागल्यामुळे प्रस्थापितांची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

jaysingpur political news : जयसिंगपुरात प्रस्थापितांबाबत नाराजी

नव्यांना संधी द्यावी मागणीला जोर: उलथापालथ होणार का?

न्यायालयाच्या आदेशान्वये 31 जानेवारी पर्यंत निवडणुका घेण्याचे बंधनकारक आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने
जोरदार तयारी करत निवडणुकीपूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. नगराध्यक्षपद आरक्षण, प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण या प्रक्रिया आता पूर्ण झाल्या आहेत. मतदार यादीतील हरकती घेण्यासाठीची मुदत काही दिवसापूर्वीच संपली आहे.

त्यामुळे आता नव्या मतदारयाद्या प्रसिद्ध होण्यास काही दिवसांचा कालावधी आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या की निवडणुकीचे वारे वाहू लागणार आहे. प्रभागरचना आणि प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता
इच्छुक जोमाने कामाला लागले आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्याकरिता इच्छुकांनी मोट बांधली आहे. काही प्रभागात
प्रस्थापितच आपले स्थान राखू शकतील. तर काही प्रभागात नव्या उमेदीचे उमदे चेहरे नगरसेवक म्हणून विराजमान होतील अशी स्थिती जयसिंगपूर शहरात सध्या तरी आहे.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू विकास आघाडी विरुद्ध समविचारी एकत्र येऊन निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे. पण इच्छुकांचा ओढा मात्र शाहू विकास आघाडीकडेच आहे. प्रभागांचा सर्वे करून आपल्या पारड्यात जितके माप पडते तितके माप पाडण्याकरिता नेतेमंडळी जोरदार प्रयत्न करीत आहेत. नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत कार्यकर्ते सुद्धा आता जोडण्या करू लागले आहेत.

आपल्याला मनाजोग्या जागा न मिळाल्यास एकला चलो चा नारा देखील सर्वच पक्षांचे नेते देताना दिसत आहेत. यामुळे ही निवडणूक आता अटीतटीची होणार आहे. प्रभागात होणार्‍या अटीतटीच्या लढतीत बर्‍याच दिग्गजांमध्ये सामना होणार आहे. हे दिग्गज आता आपला पाया अबाधित ठेवतात की नवे येऊन आपले स्थान भक्कम करतात याकडे आता जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. काही प्रभागात घराणेशाही पुन्हा उदयास येऊ शकते अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

प्रभागावर अनेकांच्या नजरा…

जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 हा पूर्वाश्रमीचा शाहू विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातून
आजतागायत असलम फरास यांनी बरेच वर्ष नेतृत्व केले आहे. पण सध्या या प्रभागात अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यामुळे फरास यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांला नेतृत्व करावे लागणार आहे. यामुळे या प्रभागातून सध्यातरी अशोक मळगे यांना शाहू विकास आघाडीकडून तिकीट मिळेल अशी आशा उराशी बाळगून मळगे परिवार कामाला लागले आहेत. फरास आणि मळगे यांच्या घरातील सदस्य पालिकेत जावा याकरिता मतदारात चर्चा रंगू लागली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *