karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेच्या रामानंदनगर शाखेचे आधुनिक कार्यालयात स्थलांतर

SHARE:

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेच्या रामानंदनगर शाखेचे आधुनिक कार्यालयात स्थलांतर : कर्मवीर पतसंस्थेने केलेली प्रगती ही सभासदांना अभिमान वाटावी अशी असून कर्मवीर पतसंस्थेने आदर्श कामकाज केल्यामुळेच संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केल्याचे मत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भारती चोपडे यांनी व्यक्त केले.

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेच्या रामानंदनगर शाखेचे आधुनिक कार्यालयात स्थलांतर

कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेच्या रामानंदनगर येथील शाखेचे प्रशस्त वास्तुत स्थलांतर झाले. यावेळी अध्यक्षा श्रामती चोपडे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, कर्मवीर पतसंस्थेने ठेवी आणि कर्जाच्या माध्यमातून सभासद आणि समाजासाठी मोठे योदगान दिलेले आहे आणि या पुढे ही त्याच विश्वासाने सेवा देण्याची ग्वाही चेअरमन यांनी दिली.

प्रास्ताविक करताना उपाध्यक्ष अ‍ॅड एस.पी. मगदूम म्हणाले, संस्था 64 शाखा मधून सभासदांना विनम्र सेवा पुरवित असल्यामुळे ठेवी, कर्ज, भागभांडवल यासाठी सभासदांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सभासदांचे त्यांनी आभार मानले. 68000 सभासदांचे हे विस्तारीत कुटूंब असल्याचे त्यानी नमुद केले.

या कार्यक्रमास शाखा सल्लागार राजाराम पाटील, प्रमोद मिठारी, संदिप मिठारी, संजयकुमार चौगुले, ऋतुराज पाटील, सावंतपुरचे सरपंच प्रल्हाद जाधव, शरद शिंदे, बी. एस. जाधव, पी. टी. पवार. डॉ. जी. एम. सुतार, माजी सरपंच प्रशांत नलवडे, डॉ. मुजाप्पा, डॉ. राजेंद्र शेंडगे, अख्तर पिरजादे, राजेंद्र बिडवे, वासिम मुल्ला, गणेश पाटील, एस. वाय पाटील, आर. एम. पाटील, प्रसाद कुलकर्णी, यांच्यासह संस्थेचे संचालक रावसाहेब पाटील, डॉ. अशोक सकळे ए. के. चौगुले, डॉ. रमेश ढबू, वसंतराव नवले, चेतन पाटील, डॉ. एस. बी. पाटील, तज्ञ संचालक लालासाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते. शाखाधिकारी संतोष इंगलजे यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *