kasbe digraj news : कसबे डिग्रज – साठ वर्ष ओपन राहिलेला जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद: मिरज तालुक्याच्या राजकीय इतिहासात काही मतदारसंघ केवळ निवडणूक क्षेत्र नसतात, तर ते नशिब, परंपरा आणि नेतृत्वाचा अखंड प्रवास असतात. असाच एक सुदैवी आणि तेजस्वी मतदारसंघ म्हणजे कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ!
kasbe digraj news : कसबे डिग्रज – साठ वर्ष ओपन राहिलेला जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद
कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ – नशिबाचा लाडका आणि नेतृत्वाचा वारसा!
गेल्या तब्बल साठ वर्षांपासून हा मतदारसंघ ओपन राहिला आहे, ही केवळ नोंद नाही तर एक अविरत परंपरा, लोकशाहीचा अनोखा योगायोग आणि या भूमीच्या उदार राजकीय स्वभावाचे प्रतीक आहे. आणि विशेष म्हणजे, यंदाही हा मतदारसंघ ओपन घोषित झाला आहे!
या मातीतून अनेक दिग्गज नेत्यांनी आपली राजकीय कारकीर्द फुलवली –
आप्पासाहेब बिरनाळे, सुरेश पाटील, बाळासाहेब मासुले, श्रीपाल चौगुले, लीलाधर पाटील, विशाल चौगुले आणि संयोगिता कोळी या नावांनी या मतदारसंघाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी ठसा उमटवला आहे.
आप्पासाहेब बिरनाळे यांचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. 1967 मध्ये आप्पासाहेब बिरनाळे सांगली विधानसभा मतदार संघातून आमदार झाले. आमदारकी संपल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला. डिग्रज मतदार संघातून जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. हा क्षण आजही या भूमीचा अभिमान आहे.
राजकीय समीकरणांच्या खेळात हा मतदारसंघ आज सांगली आणि इस्लामपूर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असला तरीही, त्याची ओळख आणि वजन कायम टिकून आहे.
या मतदार संघावर येथे आज आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि भाजप नेत्या जयश्री पाटील या तीन प्रभावी व्यक्तिमत्वांचे वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे या क्षेत्राचा राजकीय नकाशा सतत रंगत राहतो.
कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, नांद्रे, पद्माळे आणि तुंग या ग्रावांची ही भूमी केवळ मतदारसंघ नाही, तर ती सामाजिक ऐक्य, राजकीय जागरूकता आणि नेतृत्व परंपरेची पवित्र भूमी आहे.
जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आजवर – संयोगिता कोळी यांच्या अपवाद वगळता – हा मतदारसंघ कायम ओपन राहिला आहे.
ही केवळ नोंद नाही, तर एक संदेश आहे -की कसबे डिग्रजचा मतदारसंघ म्हणजे संधीचा दरवाजा, नेतृत्वाचा पाळणा आणि लोकशाहीचा जिवंत उत्सव!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











