sangli zp arakshan : कामेरी, भोसे, भिलवडी, कोकरुड, कसबेडिग्रज, येळावी, कुंडल गट झाले खुले : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ग्रामीण प्रशासनातील महत्वाची संस्था असलेल्या जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील 38 मतदारसंघ खुले झाले असून त्यापैकी 19 ठिकाणी महिलांसाठी राखीव झाले. ओबीसी 16 उमेदवारांना संधी मिळणार आहे. तर अनुसूचित जातीसाठी 7 मतदारसंघ राखीव झाले असून यापैकी चार ठिकाणी महिलांसाठी आरक्षित राहतील.
sangli zp arakshan : कामेरी, भोसे, भिलवडी, कोकरुड, कसबेडिग्रज, येळावी, कुंडल गट झाले खुले
38 मतदारसंघ खुले, 19 महिलांसाठी राखीव, ओबीसी 18 तर अनु जातीसाठी 7 मतदारसंघ आरक्षित
निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्याही वाढल्याने आरक्षण सोडतीवर अनेकांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. सोडतीत अनेकांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने दिग्गजांना धक्का बसला. अध्यक्षपदांसह सदस्य होण्यासाठी नव्यांना संधी मिळणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून मिनाक्षी महाडीक, हर्षदा महाडीक, रेणुकादेवी देशमुख, शिंदे सेनेतून सोनिया बाबर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतून संगिता पाटील, सप्रिया पाटील, भाग्यश्री शिंदे, मेघा कचरे, काँग्रेसमधून वैशाली कदम यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, तहसिलदार लिना खरात यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. रियांश अभिजीत कांबळे, शौर्य अभिजीत कांबळे, अभिज्ञा अभिजीत कांबळे या जुळ्या भावंडांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातींसाठी 7, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16 आणि 38 खुल्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाल्याप्रमाणे आरक्षण सोडत चिठ्ठ्या काढून काढण्यात आले, सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 7 जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये 4 महिलांचे आरक्षण काढण्यात आले.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका आदेशानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता एकूण देय जागांपैकी 27 टक्के जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली, ज्यामध्ये 16 जागांसाठी सोडत काढली त्यापैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत काढून उर्वरित 38 जागा खुल्या राहिल्या. त्यापैकी 19 महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.
जिल्ह्यात तब्बल 38 मतदारसंघ खुले
जिल्हा परिषेदेच्या 61 गटापैकी तब्बल 38 मतदारसंघ खुले झाले आहेत. त्यापैकी 19 ठिकाणी महिलांसाठी राखीव झाले. कामेरी, दरीबडची, बनाळी, भोसे, भाळवणी, भिलवडी, बावची, कोकरुड, खरसुंडी, कसबेडिग्रज, येळावी, चिंचणी, मांजर्डे, मणेराजुरी, विसापूर, चिकुर्डे, करगणी, मांगले आणि कुंडल हे गट खुले झाले. महिलांसाठी बागणी, पणुंब्रे वारुण, निंबवडे, वाटेगाव, नागेवाडी, जाडरबोबलाद, दुधोंडी, एरंडोली, कासेगाव, रेठरे हरणाक्ष, वांगी, डफळापूर, वाकुर्डे बुद्रुक, संख, लेंगरे, येलूर, करंजेख आरग आणि देशिंग हे मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले.
आठ मतदारसंघ पुन्हा खुलेच…
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 60 मतदारसंघापैकी 34 गट खुले होते. 2025 आरक्षणामध्ये 2017 मधील तब्बल आठ जिल्हा परिषदेचे गट पुन्हा खुले राहिले आहेत. त्यामध्ये कोकरुड, चिकुर्डे, कसबेडिग्रज, भिलवडी, कुंडल, मणेराजुरी, चिंचणी, विसापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश आहे.
ओबीसीसाठी 18 मतदारसंघ
ओबीसीसाठी मतदारसंघ आरक्षित करताना यापूर्वी कधीही नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित नसलेल्या मतदारसंघाला प्राधान्य देण्यात आले. अठरा गटापैकी नऊ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करताना चिठ्ठी काढावी लागली. त्यामध्ये शेगाव, दिघंची, मुचंडी, कुची, ढालगाव, वाळवा, अंकलखोप आणि समडोळी हे गट पुरुषांसाठी तर देवराष्ट्रे, पेठ, बोरगाव, बिळूर, कडेपूर, कवठेपिरान, तडसर आणि बुधगाव हे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ ओबीसी महिलांसाठी आरक्षित राहिले.
अनुसूचित जातीसाठी 7 ठिकाणी संधी
अनुसूचित जातीसाठी उतरत्या क्रमाने आरक्षण निघणार असल्याने यापूर्वी ज्या गटामध्ये आरक्षण पडले होते, तो गट वगळण्यात आले होते. रांजणी, उमदी आणि सावळज हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. तर कवलापूर, मालगाव, म्हैसाळ एस आणि बेडग जिल्हा परिषदेचे गट महिलांसाठी आरक्षित झाले.
मिरज तालुक्यात चार जागा अनु जाती महिला
अनुसूचित जातीच्या 7 जागांसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने चिठ्ठ्या काढण्यात आल्या, ज्यामध्ये 4 महिलांचे आरक्षण काढण्यात आले. त्यानुसार म्हैसाळ (एस), मालगाव, कवलापूर, बेडग आशा चार ठिकाणी महिला अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षण पडले. उर्वरित रांजणी, उमदी आणि सावळज या जागी पुरुषांना संधी मिळणार आहे.
तासगावात सहापैकी पाच गट खुले
तासगाव तालुक्यातील सहापैकी पाच गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये थेट महिलांसाठी एकही गट आरक्षित नाही. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून महिला सदस्य येऊ शकतात. कडेगाव तालुक्यात चारही गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यात तीन नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.
वाळवा, मिरजेत महिलाराज
वाळवा आणि मिरज या दोन तालुक्यात प्रत्येकी 11 गट आहेत. या दोन्ही तालुक्यात महिलांसाठी एकूण 15 जागा आरक्षित आहेत. यात मिरज तालुक्यात आठ तर वाळवा तालुक्यात सात महिला सदस्य असतील.
गावातील पारांवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चर्चा रंगू लागली असताना आरक्षण बदल्याने अनेकांना जिल्हा परिषदेत निवडून जाण्याची संधी हुकली. त्यामध्ये दिग्गजांचाही समावेश असल्याने नेत्यांसह राजकीय कार्यकर्त्यांना धक्का बसला. काही मतदारसंघात आरक्षणामुळे दुसर्या फळीतील कार्यकर्त्यांना काहींना संधी उपलब्ध झाली आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचे चित्र दिसून येते.
दरम्यान दरम्यान आरक्षण सोडतीची मंगळवारी (दि. 14) अधिसूचना जाहीर होईल. 14 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीसाठी हरकती असल्यास तहसिलदार कार्यालयात हरकत दाखल करता येईल. 27 ऑक्टोंबरपर्यंत हरकतीवर घोषवारा जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील, 31 ऑक्टोंबरपर्यंत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय देतील, 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी अंतिम आरक्षण जाहीर करतील.
…यांना पुन्हा संधी
माजी उपाध्यक्ष रणजित पाटील (कामेरी), शरद लाड (कुंडल), ब्रह्मनंद पडळकर (निंबवडे), अमित पाटील (येळावी), विराज नाईक (मांगले), संजीवकुमार पाटील व अभिजीत पाटील (चिकुर्डे), विशाल चौगुले (कसबेडिग्रज), डी. के. पाटील व प्रभाकर पाटील (चिंचणी), सतिश पवार (मणेराजुरी), सुरेंद्र वाळवेकर (भिलवडी), जयश्री पाटील (एरंडोली), अर्जुन पाटील व सुनिल पाटील (विसापूर).
अध्यक्ष पदाचे दावेदार…
जिल्हा परिषद अध्यक्ष पद सर्वसाधाण महिलासाठी राखीव झाले आहे. यामध्ये भाजपकडून मिनाक्षी नानासाहेब महाडिक, हर्षदा राहुल महाडिक, रेणुकादेवी सत्यजित देशमुख, एकनाथ शिंदे शिवसेनेकडून शितल अमोल बाबर, सोनिया सुहास बाबर, रयत क्रांतीकडून मोहिनी सागर खोत, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवयानी नाईक, राष्ट्रवादी पवार गटाकडून सुप्रिया देवराज पाटील, संगीता संभाजीराव पाटील, अश्विनी नाईक, भाग्यश्री वैभव शिंदे, मेघा संभाजी कचरे, काँग्रेसकडून वैशाली शांताराम कदम यांची नावे चर्चेत आहेत.
यांचा झाला पत्ता कट
माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्राजक्ता कोरे, शिवाजी डोंगरे, काँग्रेसचे पक्षप्रतोद जितेंद्र पाटील, माजी सभापती प्रमोद शेंडगे, सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी, आशा पाटील, अरुण राजमाने.
जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय आरक्षण 2025
जिल्हा परिषद गट ः आरक्षण
आटपाडी (4) :
दिघंची ः ना. मा. प्र.
करगणी ः सर्वसाधारण
निंबवडे ः सर्वसाधारण महिला
खरसुंडी ः सर्वसाधारण
जत (9) :
जाडर बोबलाद ः सर्वसाधारण महिला
उमदी ः अनुसूचित जाती
संंख ः सर्वसाधारण महिला
दरीबडची ः सर्वसाधारण
मुचंडी ः ना. मा. प्र.
बनाळी ः सर्वसाधारण
शेगाव ः ना. मा. प्र.
डफळापूर ः सर्वसाधारण महिला
बिळूर ः ना. मा. प्र. महिला
खानापूर (4) :
नागेवाडी ः सर्वसाधारण महिला
लेंगरे ः सर्वसाधारण महिला
करंजे ः सर्वसाधारण महिला
भाळवणी ः सर्वसाधारण
कडेगांव (4):
तडसर ः ना. मा. प्र. महिला
कडेपूर ः ना. मा. प्र. महिला
वांगी ः सर्वसाधारण महिला
देवराष्ट्रे ः ना. मा. प्र. महिला
तासगाव (6) :
मांजर्डे ः सर्वसाधारण
सावळज ः अनुसूचित जाती
विसापूर ः सर्वसाधारण
येळावी ः सर्वसाधारण
चिंचणी ः सर्वसाधारण
मणेराजुरी ः सर्वसाधारण
कवठेमहांकाळ (4) :
ढालगाव ः ना. मा. प्र.
कुची ः ना. मा. प्र.
देशिंग ः सर्वसाधारण महिला
रांजणी ः अनुसूचित जाती
पलूस (4) :
कुंडल ः सर्वसाधारण
दुधोंडी ः सर्वसाधारण महिला
अंकलखोप ः ना. मा. प्र.
भिलवडी ः सर्वसाधारण
वाळवा (11) :
रेठरे हरणाक्ष ः सर्वसाधारण महिला
बोरगाव ः ना. मा. प्र. महिला
कासेगाव ः सर्वसाधारण महिला
वाटेगाव ः सर्वसाधारण महिला
पेठ ः ना. मा. प्र. महिला
वाळवा ः ना. मा. प्र.
कामेरी ः सर्वसाधारण
चिकुर्डे ः सर्वसाधारण
बावची ः सर्वसाधारण
बागणी ःसर्वसाधारण महिला
येलूर ः सर्वसाधारण महिला
शिराळा (4) :
पणुंब्रे तर्फ वारुण ःसर्वसाधारण महिला
वाकुर्डे बुद्रुक ः सर्वसाधारण महिला
कोकरूड ः सर्वसाधारण
मांगले ः सर्वसाधारण
मिरज (11) :
भोसे ः सर्वसाधारण
एरंडोली ः सर्वसाधारण महिला
आरग ः सर्वसाधारण महिला
बेडग ः अनुसूचित जाती महिला
मालगाव ः अनुसूचित जाती महिला
कवलापूर ः अनुसूचित जाती महिला
बुधगाव ः ना. मा. प्र. महिला
कसबे डिग्रज ः सर्वसाधारण
कवठेपिरान ः ना. मा. प्र. महिला
समडोळी ः ना. मा. प्र.
म्हैसाळ ः अनुसूचित जाती महिला
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











