kavteeakand news : कवठेएकंदला शोभेच्या दारूचा भीषण स्फोट:

SHARE:

kavteeakand news : कवठेएकंदला शोभेच्या दारूचा भीषण स्फोट: : तालुक्यातील कवठे एकंद येथील सुतार गल्ली परिसरात शोभेची दारूचे काम करत असताना दारुचा भीषण स्फोट रविवारी झाला. यात सहा जण जखमी झाले. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. या स्फ़ोटाच्या या घटनेत एक जण गंभीर जखमी असून पाच जणांना किरकोळ भाजले आहे.

kavteeakand news : कवठेएकंदला शोभेच्या दारूचा भीषण स्फोट:

आठ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, प्रशासनाचा हलगर्जीपणा

घटनास्थळी तासगाव पोलीसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मात्र प्रशासनाचा हलगर्जीपणा या घटनेत दिसून आला आहे.
तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे दसर्‍या निमित्त शोभेचे दारू काम करण्याची प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर शोभेचे दारू काम करण्याचे काम गावात ठिकठिकाणी सुरू आहे. रविवारी दुपारी सुतार गल्ली परिसरात सार्वजनिक मंडळाकडून शोभेचे दारूकाम बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी दारूचा भीषण स्फ़ोट झाला. आवाजाच्या दणक्याने कवठे एकंद परिसर हादरला. माहिती मिळताच घटनेच्या ठिकाणी मदत कार्यासाठी शेकडो तरुण धावले.

या स्फोटात आशुतोष बाळासाहेब पाटील (वय 16), आनंद नारायण यादव (वय 55), विवेक आनंदराव पाटील (वय 38), गजानन शिवाजी यादव (वय 28), अंकुश शामराव घोडके (वय 21), प्रणव रविंंद्र आराधे (वय 21), ओमकार रविंद्र सुतार (वय 21) आणि सौरभ सुहास कुलकर्णी (वय 27) हे आठजण भाजून जखमी झाले आहेत. यापैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून अन्य सहा जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रूग्णालयात दाखल असलेल्या दोघांची प्रकृर्ती चिंंताजनक असल्याचे सांगण्यात आले. जखमींना उपचारार्थ सांगली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास तासगाव पोलिसांकडून सुरु असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

kavteeakand-news-horrible-explosion-of-liquor-in-kavteeakand

नियम फाट्यावर….

2018 रोजी कवठेएकंद येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर तत्कालीन पोलीस, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी काही नियम गावकर्‍यांना घालून दिले होते. दारू तयार करण्याचे ठिकाण गावाबाहेर असावे, तसेच काही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले मात्र पुन्हा सर्व नियम फाट्यावर मारून ग्रामस्थांकडून मानवी वस्तीत दारू तयार करण्याचे उद्योग सुरू आहेत. पोलीस व प्रशासनाला याची माहिती आहे. मात्र तरीही याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते याचाच परिणाम या स्पोटाच्या घटनेने झाला. प्रशासनाने वेळीच याची काळजी घेतली असती तर ही घटना घडली नसती असे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *