jayant patil news : शेतकर्यांचा प्रचंड नुकसान; मदतीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन घ्या : राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांकडे केली आहे.
jayant patil news : शेतकर्यांचा प्रचंड नुकसान; मदतीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन घ्या
आ. जयंत पाटलांची राज्यपालांकडे मागणी
आ. जयंत पाटील यांनी याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून तर पावसाचा जोर अधिकच वाढला आहे. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतीचा चिखल झाला आहे, शेतकर्यांची जनावरे दगावली आहेत, पूरग्रस्त भागात अनेक लोक अडकले आहेत, तर काही लोकांनी जीव गमावला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली जात आहे. शेतकर्यांवर मोठा बिकट काळ ओढावला आहे.
पूराच्या पाण्यामुळे फक्त पिके नष्ट झाली असे नाही तर शेतकर्यांच्या जमिनीही खरडून वाहून गेल्या आहेत. नुकसान इतके झाले आहे की शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिर होणार नाही असे दिसते. अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. पण सरकार असे करताना दिसत नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तात्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











