kavtepiran news : कवठेपिरान ऑन फायर, विकासाचा जंगी जल्लोष : कवठेपिरानच्या मातीने आज खर्या अर्थाने इतिहास घडवला! वारणा डेअरीसमोरील विशाल पटांगणावर उसळलेली प्रचंड गर्दी, गावातील प्रत्येक चेहर्यावरचे आनंदाश्रू, अपेक्षांनी चमकणारे डोळे – हे सारे दृश्य जणू एका नव्या पर्वाची नांदी ठरत होते.
kavtepiran news : कवठेपिरान ऑन फायर, विकासाचा जंगी जल्लोष
आजच्या या महाग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे रणशिंग फुंकले गेले आणि कवठेपिरानच्या भूमीत नवी उमेद जागी झाली. संत गाडगेबाबांच्या पुतळ्यास हार घालून सभेला प्रारंभ झाला आणि वातावरणात भक्ति-शक्तीचा, प्रेरणेचा दरवळ पसरला.
आदर्श सरपंच भिमराव माने यांनी सभेत जे उदगार काढले, ते केवळ भाषण नव्हते – ती गावाच्या स्वप्नांची शपथ होती!

कवठेपिरान महाराष्ट्रातील आदर्श गाव बनवणारच!
अशी शपथ त्यांनी घेतली आणि सभेत उपस्थित असलेल्या तब्बल तीन हजार ग्रामस्थांच्या हृदयात नवी ऊर्जा संचारली. त्यांच्या या शब्दांना सभेतील प्रत्येक श्रोत्याने टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांची उपस्थिती.
नरवाडे यांनी आपल्या भाषणात आत्मविश्वासाने सांगितले की – कवठेपिरान हे गाव या अभियानातून स्वतःची नवी ओळख निर्माण करेल आणि जिल्ह्यातील इतर गावांसाठी प्रेरणास्थान बनेल. शिंदे यांनी श्रमदानाची महती सांगत सर्व ग्रामस्थांना आवाहन केले -गुणात्मक वाढ होण्यासाठी आपण सर्वांनी कष्ट घ्यायला हवेत. गावाला घडवायचे असेल तर प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे.
kavtepiran-news-kavtepiran-news-kavtepiran-news-hyderabad-gazetteer-decision-finds-itself-in-a-vortex-of-controversy
सभेत सचिन कदम, मदन यादव, प्रा. महादेव माळी, धनंजय थोरात, सरपंच सौ. अनिता माने यांनीही आपल्या प्रभावी भाषणांनी गावकर्यांच्या मनात जोश निर्माण केला. सहा. गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे, उपसरपंच सुशांत देसाई, आण्णासो पाटील, राजेंद्र तामगावे, सौ. अलका जाखलेकर, रघुनाथ दिंडे, भानुदास पाडळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सभेला गौरव प्राप्त करून दिला.

सूत्रसंचालन राजेंद्र साळुंखे यांनी अप्रतिम केले तर ग्रामपंचायत अधिकारी लखन सनदी यांनी आभार मानून सभेची सांगता केली. ही सभा केवळ कार्यक्रम नव्हती, तर कवठेपिरानच्या भविष्याचा आराखडा होती. गावातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर, प्रत्येक मन आज जणू नवा श्वास घेत आहे. ही महाग्रामसभा संपली असली, तरी कवठेपिरानच्या समृद्धीची कहाणी आजच लिहिली जाऊ लागली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











