maratha morcha news : हैद्राबाद गॅझेटियर निर्णय सापडला वादाच्या भोवर्‍यात

SHARE:

maratha morcha news : हैद्राबाद गॅझेटियर निर्णय सापडला वादाच्या भोवर्‍यात: मराठा समाजाच्या आरक्षणा संबधीत मागण्या संदर्भात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आमरण उपोषणानंतर राज्यातील महायुती सरकारने सध्या मराठा समाजासाठी हैद्राबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र महायुती सरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावर आक्षेप घेतल्यानंतर हा निर्णय वादात सापडला आहे. या निर्णयाला विरोध केला जात असून मराठा विरोधात ओबीसी असा संघर्ष भविष्यात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

maratha morcha news : हैद्राबाद गॅझेटियर निर्णय सापडला वादाच्या भोवर्‍यात

या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेय की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. आता या निर्णयानुसार नियमांच्या अधीन राहून मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र दिले जात आहे. याच प्रमापत्राच्या मदतीने मराठा समाजाला आता ओबीसी प्रवर्गातील आरक्षण घेता येणार आहे. यालाच आपला विरोध असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेय तसेच आता ओबीसीच्या इतर काही संघटनांनी थेट न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता न्यायालयाची लढाई चालू झालेली असताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे थप्प झालेल्या मुंबई संदर्भात टिका केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर आता बंजारा समाजही पेटून उठला आहे. याच हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदीनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा आणि एसटीचे आरक्षण लागू करावे, अशी मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारी एकच आहेत, असे विधान केले. या विधानानंतर चांगलाच वाद पेटला. याबाबत विचारता भुजबळ यांनी या वादावर थेट भाष्य करणे टाळले.

मात्र हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर काय काय नवे प्रश्न निर्माण होतील यावर बोलताना एकदा हैदराबाद गॅझेटप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायची सुरुवात झाली की आपण अनेक संकटांना आमंत्रण देतो. अनेक प्रश्न उपस्थित होतात, हा त्यामागचा अर्थ आहे. मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही, असे याआधीच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहे.

त्यामुळेच या समाजाला ओबीसीमध्ये घेता येत नाही. पण अलिकडे जे निर्णय घेण्यात आले, त्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. तसेच, मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या माध्यमातून दबाव निर्माण केला. तीन ते चार दिवस दक्षिण मुंबई बंद करण्यात आली. त्यानंतर जे निर्माण झालं त्यानंतर आता वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

maratha-morcha-news-hyderabad-gazetteer-decision-finds-itself-in-a-vortex-of-controversy

ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. भटक्या विमुक्तांचे नुकसान होत आहे. थेट ओबीसीतून मराठा समाजाल आरक्षण मागितले जात आहे. असे असेल तर मराठा समाजाला दुसरे 10 टक्के आरक्षण मिळालेले आहे, ते नको आहे का? ईडब्ल्यूएसच्या माध्यमातूनही मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे. तेही आरक्षण त्यांना नको आहे का? हाच प्रश्न उच्च न्यायालयाने विचारलेला आहे, असेही मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *