khanapur election news :खानापूरचा सभापती होणार नागनाथनगर गणातून

SHARE:

khanapur election news :खानापूरचा सभापती होणार नागनाथनगर गणातून: खानापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे व तालुक्यातील नागनाथनगर पंचायत समिती हा एकमेव गण या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे सभापती पदासाठी नागनाथनगर पंचायत समिती गणाला पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. आमदार सुहास बाबर यांचे या गणावरील वर्चस्व पाहता ते नेमके कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

khanapur election news :खानापूरचा सभापती होणार नागनाथनगर गणातून

आमदार सुहास बाबर नेमकी कोणाला संधी देणार ? याकडे लागल्या नजरा

खानापूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी आरक्षित झाले. त्यानंतर कोणत्या गणात हे आरक्षण चिठ्ठीद्वारे निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु तालुक्यातील आठ पैकी केवळ नागनाथनगर या एकमेव गणात सभापतीपदाचे हे आरक्षण पडले आहे. यापूर्वी माहुलीच्या भारती विजय पाटील या खानापूर पंचायत समितीच्या सभापती होत्या, त्यामुळे या गणाला सभापती होण्याची दुसर्‍यांदा संधी मिळणार आहे.

नागनाथनगर, हिंगणगादे,घानवड ,माहुली, चिखलहोळ, वलखड, अशी या गणात येणारी गावे आहेत. आमदार सुहास बाबर जेंव्हा पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यावेळी त्यांच्या जिल्हा परिषद गटात या गणाचा समावेश होता आमदार बाबर हे त्यावेळी जिल्हा परिषदेला जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. आजअखेर या गणावर बाबर गटाचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे बाबर समर्थकांचे वर्चस्व असल्याने आमदार बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर हे कोणाला संधी देतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळाले व त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाला. अनेकांनी ओबीसी कुणबी हा दाखला मिळविला आहे. त्यामुळे याही गणात तिकीट मिळविण्यासाठी चुरस अपेक्षित आहे. या पुर्वी या गणातील माहुली येथिल भारती विजय पाटील यांना सभापती म्हणून तर नागनाथनगरचे बाळासाहेब नलवडे उपसभापती होते. त्यामुळे या गणाला आणखी एक नवी संधी निर्माण झाली आहे.

नामांतरनंतरची पहिली निवडणुक

या आधी या गणाला नागेवाडी गण असे संबोधले जायचे पण आता नागेवाडी चे नागनाथनगर असे नामकरण करण्यात आले आहे. नामकरणानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *