kolhapur election news : कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम

SHARE:

kolhapur election news : कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम : कोल्हापुरात काँग्रेसकडून 48 जणांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेण्यात आली असली, तरी अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून संघर्ष सुरूच आहे. अजूनपर्यंत कोणत्याही फॉर्मुल्यावर अंतिम शिकामोर्तब झालं नसल्याने चर्चेचं गुर्‍हाळ अजूनही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिला उमेदवारी अर्ज आज (27 डिसेंबर) दाखल करण्यात आला. भाजपची यादी येण्यापूर्वीच खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक तीनमधून आज शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला.

kolhapur election news : कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम

जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला

महायुतीतील राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता

दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये अजूनही बैठकांचा फेर्‍यांवर फेरा सुरूच आहे. राष्ट्रवादी 20 जागांसाठी अजूनही ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी प्रमाणेच आता महायुतीतील राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे.

जागावाटपाचा तिढा सोडवण्यसाठी अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. भाजपला 39 शिवसेना 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 11 जागा देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अजित पवार गटाने 11 जागांना सपशेल नकार दिला आहे. दुसरीकडे जनसुराज्य पक्ष सुद्धा महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, आता जनसुराज्यचा विषय भाजपच्या गळ्यात घातल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे आता जनसुराज्यला काही जागा द्यायच्या असतील, तर भाजप आपल्या पदरात अधिक जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

तिसर्‍या आघाडीत शरद पवारांची राष्ट्रवादी

दरम्यान, कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी आणि आप सर्व जागांवर तिसरी आघाडीच्या माध्यमातून उमेदवार देणार आहेत. काल दोन्ही पक्षांनी संयुक्त परिषदेत आघाडीची घोषणा केली. महाविकास आघाडीत जागावाटपात सन्मानजनक जागा मिळत नसल्याने शरद पवारांची राष्ट्रवादी तिसर्‍या आघाडीशी चर्चा करत आहे.

काल आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला वंचित महानगराध्यक्ष अरुण सोनवणे व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्याबरोबर राष्ट्रवादीकडून 81 जागेबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आमदार विनय कोरे यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, प्रदेश निरीक्षक व राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, कार्याध्यक्ष अनिल घाटगे हजर होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *