kupwad murdar news : कुपवाड येथे प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घुण खून : एमआयडीसी मधील नटराज कंपनी जवळ रस्त्यालगत शुक्रवारी रात्री प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एका युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घालून खून केल्याची घटना घडली. उमेश मच्छिंद्र पाटील ( वय 21 वर्ष रा.श्रीनगर मशीद जवळ कुपवाड) असे मयत तरुणाचे नाव आहे.घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली.
kupwad murdar news : कुपवाड येथे प्रेमप्रकरणातून युवकाचा निर्घुण खून
कुपवाड एमआयडीसी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत दोघा जणांना अटक केली.साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारे ( वय 24 रा. सध्या बामणोली .मूळ बुलढाणा)
मॉडेल सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे (वय 20 रा. बाळूमामा मंदिर गणेश नगर बामणोली.) अशी अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, एम आय डी सी मधील एका पुठ्याच्या कारखान्यात मयत उमेश पाटील व अथर्व उर्फ सोन्या शिंदे हे कामाला होते.शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या दरम्यान नटराज कंपनी जवळ रस्त्यालगत अंधाराचा फायदा घेत संशयित सोन्या व त्याच्या साथीदार हल्लेखोरांनी प्रेमप्रकरणाच्या कारणावरून उमेश पाटील यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वर्मी घाव घातले. वर्मी घाव बसल्याने गंभीर जखमी अवस्थेत उमेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसतात हल्लेखोरांनी पलायन केले. घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उमेश पाटील याला आयुष्य हेल्पलाइन टीमच्या रुग्णगवाहिकेतून शासकीय दवाखान्यात दाखल केले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले.
Young man brutally murdered over love affair in Kupwad
घटनेची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहा.पो.नि.दीपक भांडवलकर ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच दोघाजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
संशयितांवर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.प्रेमप्रकरणातून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











