manoj jaranje news : मंत्रालय परिसराला छावणी स्वरूप; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर पासून उपोषण सुरु आहे.या पार्श्वभूमीवर आज मंत्रालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अनुचित प्रकार रोखण्यासाठी मंत्रालयाकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मराठा आंदोलक मंत्रालयात घुसण्याची शक्यता असल्याने मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर दंगल नियंत्रण दलाचे पोलिस तैनात करण्यात आल्याने मंत्रालय आणि मंत्रालय परिसराला छावणी स्वरूप आले आहे.
manoj jaranje news : मंत्रालय परिसराला छावणी स्वरूप; सर्वत्र कडेकोट बंदोबस्त
मंत्रालयाकडे येणारी वाहतूक बंद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर शुक्रवार पासून उपोषण सुरु आहे.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत.या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय,विधानभवन,राजकीय पक्षांची कार्यालये तसेच अनेक मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आंदोलनाचा चौथा दिवस असून आरक्षणावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने आंदोलक मुंबईतील अनेक ठिकठिकाणी मोठ्या संख्येने फिरत आहेत.
आंदोलकांनी दुपारी मंत्रालय परिसरात येण्याचा तसेच मंत्रालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालय परिसरात दंगल नियंत्रण दल आणि राज्य राखील पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.मंत्रालयाकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून अडवण्यात आले होते.त्यामुळे मंत्रालयाकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद होती.मंत्रालय परिसरातील वाहतूक बंद असल्याने कामावर जाणा-यांचे आतोनात हाल झाले.उद्या मंगळवारी शासकिय सुट्टी असल्याने चाकरमान्यांनी घरीच थांबणे पसंत केल्याने उपनगरीय रेल्वे गाड्यांना तुरळक गर्दी होती.
आंदोलनाच्या धास्तीने सामान्यतः नेहमी गजबजलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यांभोवती भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र होते.मंत्रालयासमोर असलेले राष्ट्रवादीचे तसेच शिवसेनेचे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. गणेशोत्सवामुळे मंत्री आपापल्या मतदारसंघात असल्याने मंत्र्यांचे बंगले बंद होते.मात्र खबरदारी म्हणून मंत्र्यांच्या बंगल्यावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता.विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालय नेहमी प्रमाणे सुरू होते.
manoj-jaranje-news-mantralaya-area-turned-into-a-camp-tight-security-everywhere
मंत्रालयाचे मुख्य प्रवेशद्वार,आरसा गेट,गार्डंन गेट तसेच आकाशवाणी कॅन्टीन समोर बॅरिकेट्स लावण्यात आले होते.येथून कडक तपासणी करून केवळ शासकिय कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जात होता.मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता मंत्रालयात अभ्यागतांची तुरळक गर्दी होती.सलग सुट्ट्यामुळे मंत्रालयात कर्मचा-यांची उपस्थितीही कमी होती.त्यामुळे नेहमी गजबजलेल्या मंत्रालयात शांतता होती. मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे अर्धी दक्षिण मुंबई ठप्प झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










