kolhapur murdar news : मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक : रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (वय 25, रा. जंगमवाडी-वाटद खंडाळा, रत्नागिरी) याच्यासह बार मॅनेजर विश्वास पवार (वय 41, रा. कळझोंडी-बौद्धवाडी, रत्नागिरी) आणि कारचालक सुशांत शांताराम नरळकर (वय 40, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर याने पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.
kolhapur murdar news : मिरजोळे येथील तरुणीच्या खूनप्रकरणी आणखी दोघांना अटक
प्रियकरासह तिघांनाही 8 सप्टेंबरपर्यत कोठडी
त्यानुसार भक्ती जितेंद्र मयेकर (वय 25, रा. मिरजोळे-रत्नागिरी) हिने तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला होता; मात्र प्रियकराने तिच्याशी ब्रेक अप करत अन्य एका मुलीशी लग्न जमविले होते. आपले ठरलेले लग्न मोडेल या भीतीने भक्तीचा काटा काढण्याचे प्रियकराने ठरविले. त्यानुसार त्याने 16 ऑगस्ट रोजी तिला खंडाळा येथील बार येथे बोलावून घेतले होते. त्यानंतर तिचा केबलने गळा आवळून खून केला. ती निपचित पडल्यानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीने तिचा मृतदेह आंबा घाटात नेऊन टाकला.
भक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्रियकराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आंबा घाटात पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. या शोध मोहिमेनंतर भक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
kolhapur-murdar-news-two-more-arrested-in-the-murder-of-a-young-woman-from-mirjole
याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराने तिघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 103 (1), 238, 61 (2), 138, 127 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.
टॅटूमुळे पटली ओळख
तब्बल 14 दिवसांनी बेपत्ता भक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, तिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे हा मृतदेह तिचा असल्याचे स्पष्ट झाले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











