shaktipith mahamarg news : शक्तिपीठ महामार्गाची जिल्ह्यात पुन्हा होणार मोजणी

SHARE:

shaktipith mahamarg news : शक्तिपीठ महामार्गाची जिल्ह्यात पुन्हा होणार मोजणी : राज्यातील शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाने भूसंपादनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील शेतीची पुन्हा मोजणी सुरू होणार आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर या मोजणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तशा नोटीसा काढण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शक्तिपीठ महामार्गासाठी जिल्ह्यात 53 हेक्टर इतक्या क्षेत्राची आणि पाच किलोमिटरची मोजणी झाल्याचा दावा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आला आहे.

shaktipith mahamarg news : शक्तिपीठ महामार्गाची जिल्ह्यात पुन्हा होणार मोजणी

पाच किलोमिटरची मोजणी पूर्ण झाल्याचा दावा

सांगली जिल्ह्यासह राज्यातील 12 जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या महामार्गावर राज्यातील 19 देवस्थाने जोडली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून हा महामार्गाला सुरूवात होणार असून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे महामार्गाचा शेवट आहे. राज्य शासनाने भूसंपादनसााठी नव्याने अध्यादेश काढले आहेत. त्यामुळे पुन्हा महामार्गाला गती येणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रशासनाने मोजणी सुरू केली होती. मात्र शेतकर्‍यांनी ही मोजणी हाणून पाडली होती. सांगली जिल्ह्यातील 1340 गटांमधून हा महामार्ग जाणार असून सुमारे 596 हेक्टर क्षेत्र अधिगृहीत करण्यात येणार आहे.

यामध्ये शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, सिध्देवाडी, अंजनी, वज्रचौंडी, मणेराजुरी, सावर्डे, मतकुणकी, नागावकवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावातून जाणार आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज तालुक्यातील 19 गावांतून हा महामार्ग जाणार आहे. जिल्ह्यात 52 हेक्टर आणि पाच किलोमिटर अंतराची मोजणी झाली असल्याचा दावा प्रशानाकडून केला आहे. तसा अहवाल शासनाकडे देखील पाठविला आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील दोन आणि आटपाडी तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. तर दुसरीकडे सावळज व नागावकवठे येथे मोजणी सुरू असल्याचा दावा जिल्हा महसूल विभागाने राज्य रस्ते विकास महामंडळाकडे केला आहे.

Shaktipith highway will be re-measured in the district

आता उर्वरित 16 गावांमध्ये मोजणीसाठी नव्याने तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना पुन्हा मोजणीच्या नोटीसा देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या गावांच्या सुधारीत तारखा लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत. सध्या गणेशोत्सव असल्याने तारखा निश्चित केल्या नाहीत. पण गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा मोजणीला सुरूवात होणार आहे. तशी तयारी प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी व शासन यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवारात आला तर बदडून काढू: महेश खराडे
गणेशोत्सव झाल्यानंतर पुन्हा शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला सुरूवात होणार आहे. तशा नोटीसा काढण्यात येणार आहेत. पण जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा मोजणीचा फार्स करू नये. अधिकारी जर मोजणीला आता शिवारात आले तर त्यांना शेतकरी बदडून काढतील, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे महेश खराडे यांनी दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *