miraj accident news : कळंबीजवळ कारची टँकरला धडक, एक ठार ” मिरज तालुक्यातील कळंबी जवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टँकर व कारचा झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातातील जखमीला उपचारासाठी मिरजेतील खाजगी रुग्णालयातून नेण्यात आले होते. मयत हे उमरगा जिल्हा धाराशिव येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
miraj accident news : कळंबीजवळ कारची टँकरला धडक, एक ठार
सायंकाळी उशिरा त्यांचे नातेवाईक मिरजेत आले होते. या घटनेचे नोंद व गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलिसात सुरू होते. अपघाताबाबत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या ठिकाणी महामार्गावरील झाडांना पाणी देणारा
टँकर व मारुती कंपनीच्या कारचा या ठिकाणी अपघात झाला. महामार्गावर कारची टँकरला पाठीमागून धडक झाली आहे.
धडकेनंतर कार महामार्गाच्या बाजूला फेकली गेली होती. या कारमध्ये बाळू डोंगरे व केदार विलास महामुनी (दोघे राहणार मुरूम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव) हे दोघे प्रवास करीत होते.
अपघातात बाळू डोंगरे यांचा मृत्यू झाला तर केदार महामुनी हे जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसात नातेवाईकांकडून फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











