miraj accident news : मिरजेत डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू: मिरज-पंढरपूररोडवर शासकीय रूग्णालयासमोर डंपर व मोटरसायकलचा अपघात होवून मोटरसायकलवरील नंदिनी मच्छिंद्र दोलतडे (वय 32) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोजकुमार कृष्णदेव दोलतडे (वय 31) हा जखमी झाला आहे. डंपर चालकास मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
miraj accident news : मिरजेत डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदिनी दोलतडे या आपले दीर मनोजकुमार दोलतडे यांना मुलगी पाहण्यासाठी (एम.एच.10सी.जे.4229) या क्रमांकाची मोटरसायकल घेवून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. मोटरसायकल मिरज शासकीय रूग्णालयासमोर आल्यानंतर पाठीमागून (एम.एच.10 पी.सी.7322) या क्रमांकाचा डंपर त्याच दिशेने निघाला.
डंपर पुढे गेल्यानंतर डंपरच्या पाठीमागून दोलतडे येत असताना त्यांच्या गाडीवर नियंत्रण सुटले आणि डंपरच्या पाठीमागील चाकात नंदिनी दोलतडे या पडल्या. त्यांच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मनोजकुमार दोलतडे हा दूरवर फेकला गेला. घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली. तातडीने त्यांना शासकीय रूग्णालयात उपचारासाठी घेवून जाण्याअगोदरच त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे दोलतडे कुटूंबियांवर दु:खाचे सावट पसरले आहे.
नंदिनी दोलतडे या अतिशय मनमिळावू होत्या. त्यांच्या अशा अचानक जाण्याामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी डंपर व डंपर चालक सुरज पाटील यास ताब्यात घेतले आहे. मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











