miraj vijaynagar news : विजयनगर-मोहननगर परिसरातील रहिवाशांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा

SHARE:

miraj vijaynagar news : विजयनगर-मोहननगर परिसरातील रहिवाशांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा :  विजयनगर व मोहननगर भागास जोडणारा रस्ता तातडीने उपलब्ध करून द्यावा, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे. या मागणीसाठी संबंधितांनी रेल्वे मंत्री, रेल्वे राज्य मंत्री, तसेच सांगलीचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांना तसेच हुबळी विभागाचे मंडल रेल व्यवस्थापक (ऊठच्) यांना वारंवार पत्रव्यवहार केला आहे.

miraj vijaynagar news : विजयनगर-मोहननगर परिसरातील रहिवाशांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा

निवेदनात म्हटले आहे, सदर रस्ता सरस्वतीनगर भागास जोडण्यासाठी रेल्वे लाईनच्या दक्षिण बाजूने एनएच 160 वरील रेल्वे क्रॉसिंग गेटपासून ते म्हेत्रे मळा पर्यंत असावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेट क्रमांक 127 ते 133 दरम्यानची जमीन अधिग्रहित करून हा रस्ता उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांनी हा प्रश्न 76 वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले आहे.

15 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता रेल रोको

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता विजयनगर रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की,
मोहननगर व विजयनगर यामध्ये जोडणारा रस्ता नसल्याने शेतकर्‍यांना तसेच सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मोहननगरमधील स्मशानभूमी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दवाखाने तसेच इतर आवश्यक सेवा सुविधा या रस्त्याअभावी अडचणीत आहेत. तसेच रेल्वे गेटमुळे दररोज वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *