nandani vantara madhuri news : मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून याचिका दाखल करणार

SHARE:

वनताराच्या सीईओंची घोषणा : मठाजवळ वनतारा केंद्र उभा करणार

nandani vantara madhuri news : मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून याचिका दाखल करणार  : मागील काही दिवसांपासून महादेवी हत्ती परत मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. बुधवारी वनताराचे सीईओ विवान करानी यांनी नांदणी येथील मठाचे महास्वामी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. माधुरी हत्ती परत आणण्यासाठी नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

nandani vantara madhuri news : मठ, वनतारा आणि राज्य सरकार मिळून याचिका दाखल करणार

आम्ही सगळी म्हणजे नांदणीचा मठ, वनतारा आणि राज्य सरकार सर्वजण मिळून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. आम्ही हत्तीची या ठिकाणी चांगली व्यवस्था करणार आहे. हत्तीणीचे आम्ही लवकरच पुनर्वसन करणार आहे. आम्ही सर्वजण मिळून या गोष्टी सकारात्मक करणार आहे. अनंत अंबांनी यांगी सांगितले आहे की, आम्हाला कधीच कोल्हापूर वासियांना दु:ख द्यायचे नव्हते. त्यांना माधुरीची काळजी वनतारामध्ये घ्यायची होती.

यामध्ये इगो अडवा येत नाही, यामध्ये कोणाची हार किंवा विजय नाही. यामध्ये हत्तीचा विजयच आहे. कारण हत्तीला वनतारामध्येही चांगले घर मिळत होते आणि मठामध्येही चांगले घर मिळत होते. तुमची माधुरी लवकरच कोल्हापुरात येईल, अशी माहितील वनताराचे सीईओ विवान करानी यांनी दिली.

आम्ही या याचिकेमध्ये वनतारामध्ये हत्तीसाठी जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था या मठामध्ये करणार असल्याची माहिती देणार आहे. आम्ही ही याचिका पेटा आणि एचपीसी यांच्या पाठिंब्याने ही याचिका दाखल करणार आहे. आम्ही कधीही कोल्हापुरवासियांना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही, सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आला त्यावर आम्ही काम करत होतो.सगळ्यांनी समजून घेतल्याबद्दल आभारी आहे, असंही वनताराचे सीईओ विवान करानी म्हणाले.

वनताराचे सीईओ विवान करानी यांच्यासोबत बैठक झाली. नांदणी मठ, वनतारा, महाराष्ट्र सरकार यांच्यामार्फत याचिका दाखल केली जाणार आहे. मठाजवळ केंद्र उभा करण्यात येणार आहे. हत्तीची मालकी हक्क मठाकडे राहणार आहे. हत्तीच्या देखभाल, वैद्यकीय व्यवस्था वनतारा पुरवणार आहे. त्याचबरोबर समाधानकारक चर्चा झाली आहे.

nandani-vantara-madhuri-news-math-vantara-and-state-government-will-jointly-file-a-petition

माधुरी हत्ती परत येईपर्यंत वनताराने आम्हाला मदत करावी अशी आमची विनंती आहे. अनंत अबांनी यांच्या परिवाराने वनताराच्या पथकाला इथे पाठवले आहे. अंबांनी यांच्या या भूमिकेला आमचा आशीर्वाद आहे, असंही महास्वामी यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *