nandani vantara news : माधुरी हत्तीणी याचिका गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुचीबध्द होणार : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील ’वनतारा’मध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन आणि एएस चंदुकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही याचिका सुचीबद्ध करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. हे प्रकरण लवकर सुचीबद्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. माधुरी हत्तीणीला मठातून ’वनतारा’मध्ये जबरदस्तीने नेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
nandani vantara news : माधुरी हत्तीणी याचिका गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात सुचीबध्द होणार
नांदणी मठातून ‘माधुरी हत्तीणी’ला 28 जुलै रोजी जामनगर येथील ’वनतारा’च्या राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपवण्यात आले होते. ‘माधुरी’ला वनताराच्या अधिकार्यांकडे सुपूर्द करताना नांदणीतील लोकांनी भावनिक निरोप दिला होता. तिची पाठवणी करताना नागरिकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले.
जैन मठ आणि कोल्हापूरच्या जनतेच्या भावनांची दखल घेत वनताराने माधुरीसाठी नांदणी परिसरातच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे.
madhuri hatti nandani : “माझं नाव महादेवी” – एका हत्तीची आत्मकथा
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाला 1,200 वर्षांची परंपरा असून या मठाकडे 400 वर्षांपासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना, प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले होते.
त्यानुसार नांदणी येथील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरात येथील वनतारामध्ये पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याविरोधात नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण मठाची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.












