nandre news : नांद्रेचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बसगोेंडा पाटील यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश: ग्रामपंचायत अधिकारी बसगोंडा पाटील यांच्या कामाची चौकशीचे आदेश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. बसगोंडा पाटील यांनी मिरज तालुक्यातील नांद्रे गावात असताना अनेक भष्ट्राचार केले आहेत. त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे आणि नांद्रेचे मोहसीन मुल्ला यांनी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली हेाती. त्यांच्या मागणीला अनुसरून मंत्र्यांनीही हे आदेश दिले आहेत.
nandre news : नांद्रेचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी बसगोेंडा पाटील यांच्या कामाच्या चौकशीचे आदेश
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आदेश
तक्रारींचा भडिमार: ग्रामसेवकाच्या कारभाराचा काळा चेहरा उघड
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नांदे्र गावात ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात थेट ग्रामसेवकावर गंभीर आरोप करण्यात आले असून, संबंधित अधिकार्यांच्या दुर्लक्षावरही ग्रामस्थांनी रोखठोक बोट ठेवले आहे.

गावातील नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही कामासाठी ग्रामसेवकाकडून थेट लाच मागितली जात होती.
सत्तेचा गैरवापर आणि दबाव
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ग्रामसेवकाने विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याची उदाहरणे समोर आली आहेत. काम न मिळाल्यास नागरिकांना वारंवार त्रास दिला जातो, कागदपत्रे लांबवली जातात आणि तोंड बंद ठेवण्यासाठी उघडपणे पैशांची मागणी केली जात होती.
अधिकार्यांचे मौन आणि लोकांचा संताप
तक्रारी असूनही संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी कोणतीही चौकशी न करता घटनांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावरही या विषयावर तीव्र चर्चा सुरु आहे.
nandre-news-order-to-investigate-the-work-of-basgonda-patil-the-then-gram-panchayat-officer-of-nandre
ग्रामस्थांनी आता सांगली जिल्हा परिषदेच्या गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे थेट तक्रार दाखल केली आहे, तसेच विभागीय पातळीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गावकर्यांचा इशारा
गावकर्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर योग्य तपासणी करून कारवाई झाली नाही तर हे प्रकरण अधिक गंभीर वळण घेईल. त्याचबरोबर, ग्रामसेवक बसगोंडा पाटील यांच्यावर विभागीय पातळीवर चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास पदच्युतीसह कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नांद्रे गावातील ही घटना ग्रामीण भागातील प्रशासनातील भ्रष्टाचाराचे ज्वलंत उदाहरण आहे. ग्रामस्थ आता ठाम आहेत की, ज्यांनी गावाची कामे थांबवली आणि पैशांचा उघडपणे खेळ केला, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहील.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











