peta on nandani news : प्राण्याचे तारणहार की निर्दही हत्यारे? पेटाचा काळा चेहरा उघड

SHARE:

“प्राण्यांचे तारणहार की हत्यारे? – PETA वर गंभीर प्रश्नचिन्ह!”

peta on nandani news : प्राण्याचे तारणहार की निर्दही हत्यारे? पेटाचा काळा चेहरा उघड : प्राण्यांच्या हक्कांसाठी जगभरात आवाज उठवणाऱ्या PETA (People for the Ethical Treatment of Animals) संस्थेवर आता गंभीर आरोप होत आहेत. प्राण्यांच्या संरक्षणाची हाक देणारी हीच संस्था स्वतःच्या निवारा गृहात मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची हत्या (Euthanasia) करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

peta on nandani news : प्राण्याचे तारणहार की निर्दही हत्यारे? पेटाचा काळा चेहरा उघड

स्वत:ला प्राणीमित्र समजणार्‍या पेटा या संस्थेचे अनेक काळे कारनामे उघड झाले आहेत. आजपर्यंत पेटाने अनेक प्राण्यांना ताब्यात घेतले. परंतु त्यांना ताब्यात असणार्‍या हजारो प्राण्यांना त्यांनीच मृत्यूच्या दाढेत दिले आहे. अत्यंत आजारी असलेल्या प्राण्यांना पेटा थेट मारते हे वास्तव आता समोर आले आहे. यामुळे पेटावर अनेक ठिकाण खटलेही सुरू आहेत. पेटा च्या अधिकार्‍यांवर अनेक ठिकाणी आर्थिक देवाण घेवाणीची आरोपीही करण्यात आले आहेत.

आकडे बोलतात:

  • 2023 मध्ये PETA ने 3,117 प्राणी स्वीकारले.
  • त्यापैकी तब्बल 2,471 प्राणी वेदनारहित मृत्यूच्या नावाखाली मारले गेले.
  • म्हणजे जवळपास 80% प्राणी शेल्टरमधून जिवंत बाहेर पडलेच नाहीत.

विरोधकांचा आरोप:

  • PETA प्राण्यांचा तारणहार असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ते प्राण्यांचे हत्यारेच ठरत आहेत.
  • आरोग्यदायी आणि दत्तक घेण्यायोग्य प्राणीही मारले जात असल्याचे प्रकरणे प्रकाशात आली आहेत.
  • No-Kill Shelter चालवणाऱ्या संस्थांनी PETA च्या या धोरणाला थेट निर्दयी आणि दांभिक ठरवले आहे.

PETA चे स्पष्टीकरण:

  • संस्था सांगते की, गंभीर आजारी किंवा आक्रमक प्राणी दु:खातून मुक्त करण्यासाठीच Euthanasia केली जाते.
  • पण विरोधकांचा सवाल कायम आहे –
    “प्राण्यांच्या हक्कांचे नाव घेऊन त्यांचाच बळी देणे हे नैतिकतेचे कोणते उदाहरण आहे?”
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *