petrol news : उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, 10 हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले : सांगली-कोल्हापूरमहामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) बायपासवर पेट्रोल वाहून नेणारा टँकर उलटल्याने अपघात झाला. या अपघातात टँकरमधील सुमारे 10 हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक रोखली होती.
petrol news : उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, 10 हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले
मिरज येथील डेपोतून पेट्रोल भरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा टँकर उदगाव बायपास मार्गावर आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने तो अचानक रस्त्यावर आडवा झाला. टँकरच्या वरच्या भागातून पेट्रोलची वेगाने गळती सुरू झाली होती. परिसरात उग्र वास पसरल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.
धोका टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने बायपासवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे थांबवली. महामार्गावरील सर्व वाहने जयसिंगपूर शहरांतर्गत मार्गावरून उदगावच्या दिशेने वळवण्यात आली. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाच्या वाहनांना पाचारण केले होते.
बायपास बंद करून वाहतूक शहरातून वळवल्यामुळे जयसिंगपूर-उदगाव मुख्य मार्गावर अवजड वाहनांची मोठी गर्दी झाली. सुमारे तीन ते चार तास वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांच्या इंधनाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने टँकर उभा करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










