raju shetti news : सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल

SHARE:

raju shetti news : सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल :  जनतेचे, शेतकर्‍यांचे मूळ प्रश्न बाजूला रहाव्यात यासाठी सरकारने काही माणसं पेरली आहेत. जी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करतात आणि विषय दुसरीकडे नेतात, माध्यम देखील यातून सुटलेले नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांवर टीका केली. तसेच, सदाभाऊ खोत यांनाही खोचक टोला लगावला. रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

raju shetti news : सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांसाठी प्राणही देईन; राजू शेट्टींचा पलटवार, लवकर देऊन टाका, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाठी प्राण देऊ, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते. त्यावर, प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, ज्यांना ज्यांना प्राण द्यायचं आहे, त्यांना देऊन टाका म्हणा लवकर, म्हणजे महाराष्ट्र मोकळा होईल एकदाचा, असा खोचक टोला शेट्टींनी लगावला. तसेच, प्राण द्या म्हणा एकदा, आम्हाला त्यांची निष्ठा तपासायची आहे, असेही त्यांनी म्हटले.

राज्यातील मराठवाड्यात गेल्या 8 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी, आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापूर आणि धाराशिवमध्ये पाहणी दौरा केला. यावेळी, सरकारवर जोरदार टीका करत, माजी सहकारी आणि आमदार सदाभाऊ खोत यांनाही जोरदार टोला लगावला.

धाराशिवमध्ये राणी बारकूल नावाच्या महिला आंदोलन करत आहेत, त्यांच्या सासर्‍याला अतिवृष्टीमुळे धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या भगिनीची समजूत घालून त्यांचे उपोषण सोडायला लावले. तसेच, येथील पाच ते सहा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील लोकांची भेट घेतल्याचे राजू शेट्टींनी सांगितले.

शेतकर्‍याला आता आधाराची गरज आहे. पण, सरकार मीठ चोळण्याचे काम करत आहे. सोलापुरात देखील प्रचंड नुकसान झाले आहे, माती वाहून गेलीय, विहिरी बुजल्या आहेत. पिकांची गिनती करता येणार नाही, अशी स्थिती आहे. जलसंपदा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचेही शेट्टींनी म्हटले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *