tasgaon political news : संजयकाका आठ ऑक्टोंबरला राजकीय भूमिका जाहीर करणार

SHARE:

tasgaon political news : संजयकाका आठ ऑक्टोंबरला राजकीय भूमिका जाहीर करणार :  आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजयकाका पाटील हे उद्या बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी तासगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत ते आपली भविष्यातील राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

tasgaon political news : संजयकाका आठ ऑक्टोंबरला राजकीय भूमिका जाहीर करणार

संजयकाका पाटील यांच्या या ‘कार्यकर्ता संवाद बैठकीचे’ आयोजन जनाई मंगल कार्यालय, विटा रोड, तासगाव येथे दुपारी 2.00 वाजता करण्यात आले आहे. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे ओळखले जाते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिशा देणे आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक होत आहे.

राजकीय वर्तुळात या बैठकीबाबत चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये पाटील यांची भूमिका काय असणार, कोणत्या पक्षासोबत किंवा नेतृत्वाखाली ते निवडणुकीला सामोरे जाणार, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत.

तासगाव आणि कवठेमहांकाळमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या या मेळाव्यात संजयकाका पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणासंबंधी महत्त्वाची आणि स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिणाम आगामी निवडणुकांच्या समीकरणांवर होणार हे निश्चित आहे. त्यामुळे, या बैठकीकडे केवळ तासगाव-कवठेमहांकाळ तालुकाच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *