samdoli crime news : समडोळीत भरधाव दुचाकीची थांबलेल्या ट्रॅक्टरला धडक अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर. मिरज तालुक्यातील समडोळी – सांगलीवाडी रोडवरील हॉटेल वैभव जवळ रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विनायक तात्यासो मस्कर (वय 28) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर प्रवीण महादेव मस्कर (दोघे रा. समडोळी) हा गंभीर जखमी झाला आहे.
samdoli crime news : समडोळीत भरधाव दुचाकीची थांबलेल्या ट्रॅक्टरला धडक अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर.
सदरचा अपघात हा गुरुवार दि. 08 जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी अक्षय अनिल मस्कर (वय 27 रा. समडोळी) याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक प्रकाश सरडे (रा. कवठेपिरान) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मृत विनायक मस्कर आणि जखमी प्रवीण मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी मध्ये राहतात. गुरुवार दि. 08 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सांगलीहून दोघेजण त्यांची मोटारसायकल (क्र. एमएच 10 व्ही 3964) वरून गावी समडोळीकडे निघाले होते. समडोळी रोडवरील पाटील कोपरा हॉटेल वैभव जवळ त्यांची दुचाकी आली. यावेळी संशयित ट्रॅक्टर चालक प्रकाश सरडे याने रस्त्यावर धोकादायक स्थितीत त्याचा ट्रॅक्टर (क्र. एमएच 09 सिजे 3349) हा कोणतेही दिशादर्शक फलक अथवा रिप्लेक्टर न लावता पार्क केला होता.
यावेळी भरधाव वेगात असलेल्या मस्कर यांच्या दुचाकीने या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात विनायक आणि प्रवीण हे दोघेजण गंभीर झामी झाला. अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतानाच विनायक मस्कर याचा मृत्यू झाला.
या अपघात प्रकरणी अक्षय मस्कर याने सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक प्रकाश सरडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











