sangliwadi news : सांगलीवाडीत ‘राष्ट्रवादी’च्या हरिदास पाटलांचा भाजपला पाठिंबा

SHARE:

sangliwadi news : सांगलीवाडीत ‘राष्ट्रवादी’च्या हरिदास पाटलांचा भाजपला पाठिंबा  : सांगलीवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते, माजी नगरसेवक हरिदास पाटील यांनी सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. विश्वासघात झाल्याने महाविकास आघाडी विरोधात एकत्र आलो असल्याचे हरिदास पाटील यांनी सांगितले.

sangliwadi news : सांगलीवाडीत ‘राष्ट्रवादी’च्या हरिदास पाटलांचा भाजपला पाठिंबा

माजी आमदार दिनकर पाटील यांनी हरिदास पाटील यांचे स्वागत केले. हरिदास पाटील म्हणाले की, सन 2012-13 साली तात्विक मतभेद झाले. पण व्यक्तिगत टीका केली नाही. यंदा मला डावलून उमेदवारी देण्यात आली. दिनकरतात्यांनी दोनदा नगरसेवक, स्थायी सभापती पद दिले. त्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दिनकर पाटील म्हणाले की, अजिंक्य पाटील सभापती असताना आणि त्यांच्या कार्यकाळात सुमारे 22 कोटीचा निधी खर्च झाला आहे. दोन्ही गट एकत्र आल्याचा निर्णय निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

अजिंक्य पाटील म्हणाले, दोन्ही गट निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर ही एकदिलाने राहतील.  माजी संचालक प्रकाश पाटील यांनी गुरू शिष्य यांचे मनोमिलन सांगलीवाडीकरांच्या फायद्यासाठी असल्याचे सांगितले.

यावेळी प्रकाश पाटील, शशिकांत शिंदे, अवधूत जामदार, आकाराम कदम, विष्णू जामदार, गोपाळ जामदार,धनंजय पाटील,अशोक पाटील,विजय पाटील, दीपक हरूगडे, सचिन चव्हाण,पांडुरंग पाटील, राहुल पाटील, श्रीधर पाटील, सुनिल पाटील, दादा पाटील, ज्ञानेश पवार उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *