sangli election news : काँग्रेस 34, राष्ट्रवादी (अजितदादा) 33 तर शरद पवार पक्षाला 22 जागा

SHARE:

sangli election news : काँग्रेस 34, राष्ट्रवादी (अजितदादा) 33 तर शरद पवार पक्षाला 22 जागा : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाने आघाडी करण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून प्रयत्न करण्यात येत होते. त्याला अखेर यश आले आहे. पण ही आघाडी अंडरस्टॅडिंग व भाजप विरोधातील आहेत. यामध्ये काँग्रेस पक्ष 34, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार पक्ष 22 तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) पक्षाने 33 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.

sangli election news : काँग्रेस 34, राष्ट्रवादी (अजितदादा) 33 तर शरद पवार पक्षाला 22 जागा

20 पैकी 16 प्रभागात एकत्र तर सांगलीवाडी येथील प्रभाग 13, सांगलीतील प्रभाग क्रमांक 15, मिरज येथील प्रभाग क्रमांक 6 व 20 मध्ये तडजोड न झाल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या गेल्या दहा दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र गेल्या आठ दिवसात घडलेल्या राजकीय घडमोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर तयारी करत शड्डू ठोकला.

त्या पाठोपाठ शिवसेना देखील नाराज झाली. त्यांनी देखील दोन दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ही तिन्ही पक्ष स्वबळावर लढत आहेत. भाजपने 78 जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे.

तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांमध्ये आघाडी निश्चित झाली होती. पण या आघाडीमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला घेण्यासाठी खा. विशाल पाटील यांनी फिल्डिंग लावली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली देखील राज्य पातळीवरून सुरू झाल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीमध्ये समेट घडविण्यासाठी सांगलीत चार दिवस तळ ठोकला होता.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील, काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांच्याशी गुपीत चर्चा देखील केली होती. चर्चेतून महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. मात्र ही अंडरस्टॅडिंग आघाडी झाली आहे. जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीबरोबर आलेला नाही.

महापालिकेच्या 78 पैकी 33 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तर काँग्रेस 34 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार 22 या जागांवर लढत आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी मजबूत झाली आहे.

सांगलीवाडी येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तिन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. सांगली येथील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) गटाने पॅनेल लावले आहे. या ठिकाणी भाजप, काँग्रेस व अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. तर दुसरीकडे मिरज येथील प्रभाग क्रमांक वीसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बिनसले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने चार विरूध्द काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *