sangli news : शिवसेनेला अंडरइस्टिमेट, आता ताकद दाखवू: ना. शंभूराज देसाई : राज्यात सर्व ठिकाणी भाजप व शिवसेनेची युती झाली असताना सांगली महापालिकेसाठी शिवसेनेला अंडरइस्टिमेट केले आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत शिवसेना सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. ही निवडणूक ताकदीनिशी लढून भाजपला ताकद दाखवून देऊ, असा इशारा पर्यटनमंत्री तथा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी दिला.
sangli news : शिवसेनेला अंडरइस्टिमेट, आता ताकद दाखवू: ना. शंभूराज देसाई
सर्व जागा लढणार; भाजपमधील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजने शिवसेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी भाजपने युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेने मनपाच्या 78 जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. सोमवारी शिवसेनेचे नेते, ना. शंभूराज देसाई यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांनी बैठक घेत निवडणुकीचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला आ. सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडे, सुनिता मोरे आदी उपस्थित होते. या बैठकीत ना. शंभूराज देसाई यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर चर्चेच्या फेर्या झाल्या. जागा वाटपात योग्य सन्मान मिळावा, ही आमची मागणी होती. जागा वाटपात मागे-पुढे सरकायची देखील तयारी होती. मात्र भाजपने मान-सन्मान ठेवला नाही. अखेरच्या क्षणी युती तुटली. मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला लढायला शिकवले आहे. त्यामुळे आता थांबायचे नाही.
स्वबळावर लढायचे आहे. पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवायची आहे. मी देखील पूर्ण वेळ देणार आहे. भाजपने अंडरइस्टिमेट केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी पदाधिकार्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ना. शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत भाजप व महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











