पावसाची उघडीप, स्थलांतरित लोक निवार्याखालीच, पाण्याखाली गेलेले रस्ते आज खुले होणार
sangli fkood news : कोयनेतून विसर्ग बंद, पाणी गतीने ओसरणार : जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून शुक्रवारी विसर्ग बंद करण्यात आला. यामुळे कृष्णा नदीची दिवसात 7 फुटाने पाणीपातळी कमी होऊन 40 फुट झाली आहे. मात्र पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते कायम आहेत. शनिवारी दुपारपर्यंत बहुतांशी रस्ते, पुलावरील पाणीपातळी कमी होऊन वाहतुक सुरळित होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. पुरामुळे स्थलांतरित झालेले अडीच हजार नागरिक अद्याप निवार्याखालीच आहेत.
sangli fkood news : कोयनेतून विसर्ग बंद, पाणी गतीने ओसरणार
कोयना धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे धरणात 98.89 टीएमसी म्हणजेच 93.96 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे कोयना धरणाचे शुक्रवारी सायंकाळी सर्व दरवाजे बंद करुन पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत. त्याद्वारे दोन हजार 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. पाऊस आणि धरणातून विसर्ग थांबल्यामुळे कृष्णा नदीची सांगली आयर्विन पुल येथे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 3.6 फुटाने उतरुन 40 फुट झाली होती. पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
सांगली शहरातील कराड येथील कृष्णा आणि कोयना पुलांसह ताकारी, बहे पुलाची पाणीपातळी कमी झाली. सांगली, मिरज शहरातील नदीकाठच्या काही उपनगरात पाणी शिरले होते. तेथील पाणीही कमी झाल्यामुळे नागरिकांकडून घरातील स्वच्छता सुरु केली आहे. या मार्गावरील अमणापूर, भिलवडी, ताकारी पुलांवरील वाहतुक सायंकाळपासून सुरळीत सुरु झाली आहे.
sangli-fkood-news-discharge-from-koyne-stopped-water-will-drain-away-quickly
वारणा धरणाचे गुरुवारी सायंकाळीच दरवाजे बंद केले आहेत. वक्र दरवाजे बंद करुन विद्युत गृहातून एक हजार 630 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडला आहे. वारणा नदीची पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. यामुळे वारणा नदीवरील पूल, बंधारे शनिवारी रिकामे होतील, असा प्रशासनाचा दावा आहे. पुराचे पाणी कमी झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.
रस्ते मोकळे होण्यास सुरुवात
कृष्णा, वारणेवरील पाण्याखाली गेलेले पूल, रस्ते सलग तिसर्या दिवशी शुक्रवारपर्यंत पाण्यात होते. सायंकाळनंतर वारणा नदीचे पाणी कमी झाल्यामुळे शिराळा तालुक्यातील मोरणा नदीवरील कांदे-मांगले, वारणा नदीवरील चरण-कोडोली, आरळा-शित्तर, बिळाशी-भेडसगाव, कांदे-सावर्डे या पूल, बंधार्यावरील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील खटाव-नांद्रे, घोगाव-दुधोंडी, आमणापूर, भिलवडी हे पूल रिकामे झाल्यामुळे वाहतुक सुरु झाली आहे.
कृष्णा नदीची पाणी पातळी (फूट इंचामध्ये)
कृष्णा पूल कराड 22
बहे पूल 8.10
ताकारी पूल 36.5
भिलवडी पूल 39.6
सांगली आयर्विन 40
राजापूर बंधारा 42.5चौकट….
धरणातील पाणीसाठा
धरण पाणीसाठा (टीएमसी) / टक्के
कोयना 98.89 93.96
वारणा 31.62 92
धोम 13.18 98
कण्हेर 9.68 96
उरमोडी 9.82 98
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











