SANGLI LOKSABHA : सांगलीवरुन निकालापूर्वीच काँग्रेस-ठाकरे गटात ठिणगी

SHARE:

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI LOKSABHA : सांगलीवरुन निकालापूर्वीच काँग्रेस-ठाकरे गटात ठिणगी : सांगली ः लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या 24 तासावर आला असताना निकालापूर्वीच सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील विजयी होणार असल्याचा दाखवले जात आहे. काँग्रेसच्या हक्काचा बालेकिल्ला असताना हक्काची जागा ठाकरे गटाने हिसकावून घेतली. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत अतिविव्दान असून लंडनहून काल काय शिकून आल्याचे माहिती नसल्याची खोचक टोला लगावला. त्यावर संजय राऊत यांनी सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन. मी त्याबाबत बोलणारच आहे, असे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.

SANGLI LOKSABHA : सांगलीवरुन निकालापूर्वीच काँग्रेस-ठाकरे गटात ठिणगी

संजय राऊत-नाना पटोले यांच्यात कलगीतुरा, महाविकास आघाडीत बिघाडी होणार

एक्झिट पोलच्या आकडेवाडीनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. कारण महायुतीला फक्त 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत निवडणुकीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडीत वाद होता. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासून या मतदारसंघावर दावा केला जात होता. सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडकडे विनंतीदेखील केली होती. पण कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती. सांगली मतदारसंघात काँग्रेसची ताकद असताना उमेदवारी डावलण्यात आली, त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी लढवली.

परंतु यांच्यावर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन ठाकरे गटाने यापूर्वी देखील काँग्रेसवर निशाणा साधला. पण आता संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जोरदार ठिणगी पडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन. मी त्याबाबत बोलणारच आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आमचं आयुष्य राजकारणात गेले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तर दुसरीकडे राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने तयार केली, असा पलटवार नाना पटोले यांनी दिला. राऊत विद्वान आहेत. ते कालच लंडनमधून परत आले, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

विदर्भात काय निकाल लागतात? पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात? कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय? हे आम्हाला माहिती आहे. मी त्यावर नंतर बोलेन. मी प्रत्येक गोष्ट बोलणारच आहे. आम्ही सुद्धा इथे गोट्या खेळायला बसलेलो नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचं बाळंतपण ज्या दवाखान्यात झालं ते काँग्रेसने निर्माण केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर का प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहेत. याशिवाय ते कालच लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून जास्त काय शिकून आले ते माहिती नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

राऊत शिकलेली शाळा काँग्रेसने निर्माण केली

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती. त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचं बाळंतपण ज्या दवाखान्यात झाले. ते काँग्रेसने निर्माण केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसने केलं आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *