sangli market news : सांगली बाजार समितीवरील कारवाई लोकशाहीविरोधी आ. जयंत पाटील यांचे टीकास्त्र : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ कार्यरत आहे. त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी बाजार समितीचे संचालक मंडळ रद्द करण्याची कारवाई लोकशाहीविरोधी आहे. एकतर्फी कारवाईने राज्य सरकारकडून एकाधिकारशाही सुरु असल्याचे टीकास्त्र शरद पवार राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते व आ. जयंत पाटील यांनी सांगलीत सोडले.
sangli market news : सांगली बाजार समितीवरील कारवाई लोकशाहीविरोधी आ. जयंत पाटील यांचे टीकास्त्र
आ. पाटील म्हणाले, सांगली बाजार समिती देशातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे. कर्नाटक सीमेशेजारी बाजार समिती असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक होते. सांगली बाजार समितीच्या अखत्यारित जत आणि कवठेमहांकाळ बाजार समित्यांचा समावेश राहिला. वर्षानुवर्षे बाजार समितीचा कारभार तीन तालुक्यांतील संचालक समन्वय साधून करीत आहेत.
सांगली बाजार समिती मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातून लोकशाही पद्धतीने संचालक म्हणून निवडून आले आहेत. बाजार समित्यांचे विभाजन करण्यापूर्वी संचालक मंडळाचा कालावधी पूर्ण झाला पाहिजे. संचालकांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांचे पद रद्द करणे लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येते.
सांगली बाजार समितीचे तीन स्वतंत्र समित्यांमध्ये विभाजन केले आहे. सांगली मुख्य बाजारपेठ आणि उपबाजार एकमेकांवर अवलंबून असल्याने त्रिभाजन झाल्यास जत व कवठेमहांकाळ येथील बाजार समित्या तोट्यात जातील. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. सांगली बाजार समितीच्या आवारामध्ये हमाली करणारे त्याशिवाय व्यापारी, दिवाणजी अडते हे जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत.
ते वर्षानुवर्षे काम करीत आहेत. राज्यातील अनेक बाजार समित्यांचे विभाजन करण्यात येणार आहे, परंतु सद्यस्थितीत सांगली बाजार समितीचे विभाजन केले. संचालक मंडळावर करण्यात आलेली सरकारची एकाधिकारशाही असल्याचे दिसून येत आहे. याविरोधात संचालकांनी न्यायालयात दाद मागितली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
आत्तापर्यंत तिन्ही तालुक्यांच्या समन्वयाने कारभार
कर्नाटक सीमेशेजारी बाजार समिती असल्याने तेथील शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते. सांगली बाजार समितीच्या अखत्यारित जत आणि कवठेमहांकाळ बाजार समित्यांचा समावेश राहिला. वर्षानुवर्षे बाजार समितीतील तीन तालुक्यातील संचालकांनी समन्वय साधून कारभार केल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










