sangli murdar news : मिरजेत वर्चस्ववादातून अट्टल गुंडांनी तरुणाचा मुडदा पाडला; सांगलीत नवर्‍यानं बायकोला झोपेतच वार करून संपवलं

SHARE:

ऐन सणासुदीत सांगलीत दोन खुनांच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिरजेत निखिल कलगुटगी या तरुणाचा खून झाल्याची घटना काल (27 सप्टेंबर) रात्री घडली. मिरजेच्या गणेश तलावजवळ निखिलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान निखिल कलगुटगीचा मृत्यू झाला.

sangli murdar news : मिरजेत वर्चस्ववादातून अट्टल गुंडांनी तरुणाचा मुडदा पाडला; सांगलीत नवर्‍यानं बायकोला झोपेतच वार करून संपवलं

अन्य एका घटनेत सांगली शहरातील शांतीनगरमध्ये नवर्‍याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली. झोपेतच बायकोवर नवर्‍याने धारधार शस्त्राने वार करत हत्या केली. घरगुती वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बायकोची हत्या केल्यानंतर आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. कोमल प्रशांत एडके असं मृत विवाहितेचे नाव आहे.
वर्चस्ववादातून निखिलचा खून

दरम्यान, निखिलच्या खुनाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वर्चस्ववादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सर्फराज सय्यद आणि प्रतीक चव्हाणसह तीन ते चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यापूर्वी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहनवर तीन महिन्यापूर्वी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी फिर्यादीचा मामा मयत निखिल कलगुटगीने फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावपासून तानाजी चौककडे जाणार्‍या रोड फुटपाथजवळ आरोपींनी अचानक धारदार हत्याराने वार करून निखिलचा खून केला, असा संशय आहे. हल्ल्यामागे अन्य काही कारण आहे का याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत.

बायकोचा झोपेतच मुडदा पाडला

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोमल आणि तिचा नवरा प्रशांत यांच्यामध्ये वाद सुरू होते. वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा वाद काही मिटला नाही. कोमल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होती. शनिवारी प्रशांतने काजलची समजूत काढून तिला मलकापूरवरून घरी घेऊन आला होता. मात्र, आज सकाळी कोमल झोपेत असतानाच त्याने धारदार शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. कोमलची हत्या केल्यानंतर प्रशांतने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून काजलचा मृतदेह सांगली सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येची बातमी वार्‍यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *