farmar news : शेतकर्‍यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला 86 रुपयेच भरपाई

SHARE:

 farmar news : शेतकर्‍यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला 86 रुपयेच भरपाई : राज्य सरकारने ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीस मंजुरी दिली आहे. पण, मंजूर निधी पाहिला तर सरासरी गुंठ्याला 86 रुपये मिळणार आहेत. परिपक्व अवस्थेतील पिकांचे नुकसान झालेले आहे, त्यामुळे पूर्व मशागत, बियाणे, भांगलण, औषध व खत याचा खर्च शेतकर्‍याला करावा लागला आहे. सरकार मुळात मदत देतानाच 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना देते. मात्र, या मदतीतून त्याने मातीत घातलेल्या बियाण्याचा खर्चही निघत नाही.

farmar news : शेतकर्‍यांची चेष्टाच; शासनाची गुंठ्याला 86 रुपयेच भरपाई

ऑगस्टमध्ये राज्यात 15 लाख 45 हजार 250 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले हे क्षेत्र आहे. पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असताना नुकसान झाल्याने शेतकर्‍याने काढणीचा सोडला तर सर्व खर्च केलेला असतो. सोयाबीनची पेरणी गुंठ्याला दीड किलो लागते. साधारणत: शंभर रुपये किलो सोयाबीन बियाण्याचा दर आहे. शेतकर्‍याने मातीत दीडशे रुपये घातले आणि सरकार मदत देणार 86 रुपये. पेरणीपूर्व व नंतरचा खर्च सोडा किमान मातीत बियाण्याच्या रुपाने मातीत घातलेले पैसे तरी सरकारने द्यावेत.

नुकसानीच्या 9 टक्के मदत

सरकारच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देते. ऊस पिकाचा विचार केल्यास गुंठ्याला टनाचे उत्पादन धरले तर त्याचे 3 हजार रुपये होतात. सरकारचे म्हणते किमान 33 टक्के नुकसान झाले, मिळणार्‍या उत्पादनाच्या 33 टक्के भरपाई म्हणजे गुंठ्याला किमान 900 रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकार केवळ 86 रुपये देते.

शेती पिकाचे नुकसान झाल्यास, प्रतिगुंठा
जिरायत जमिनीवरील पिके – 42.50 रुपये
सिंचनाखालील जमिनीतील पिकांसाठी- 170 रुपये
बहुवार्षिक बागायती पिकांसाठी – 225 रुपये
शेतजमिनीचे नुकसान झाल्यास – 180 रुपये
दरड कोसळून नुकसान, माती वाहून गेल्यास – 470 रुपये

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *