kavtheeakand blast news : कवठेएकंद स्फोट प्रकरणी सात जणांवर गुन्हा

SHARE:

kavtheeakand blast news : कवठेएकंद स्फोट प्रकरणी सात जणांवर गुन्हा : तालुक्यातील कवठेएकंद येथे रविवारी झालेल्या स्फोटाप्रकरणी तासगाव पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शोभेची दारू बनवण्यासाठी कुठलीही परवानगी न घेता तसेच खबरदारी व प्रशिक्षण न घेता ज्वालाग्रही पदार्थ हाताळणे व स्वतःसह इतरांची सुरक्षितता धोक्यात आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार श्रीकांत अभंगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

kavtheeakand blast news : कवठेएकंद स्फोट प्रकरणी सात जणांवर गुन्हा

विनापरवाना दारू बनवणे व सुरक्षितता न ठेवल्याची पोलिसांची तक्रार

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आनंद नारायण जाधव (वय 55) कवठेएकंद, आनंद नारायण जाधव (वय 55) कवठेएकंद, विवेक आनंदराव पाटील (वय 38) दत्तमाळ तासगाव, गजानन शिवाजी जाधव (वय 28) कवठेएकंद , अंकुश शामराव घोडके (वय 29) कवठेएकंद, प्रणव रवींद्र आराध्ये (वय 21) कवठेएकंद, ओंकार रवींद्र सुतार (वय 29) कवठेएकंद, सौरभ सुहास कुलकर्णी (वय 27) कवठेएकंद यांचा समावेश आहे.

स्फोटातील जखमींची घेतली जिल्हाधिकार्‍यांनी भेट

तालुक्यातील कवठे एकंद येथे विनापरवाना दारू तयार करताना झालेल्या स्फोटातील जखमींची जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी खाजगी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांनी जखमी रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांची विचारपूस केली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा करून जखमींना उपचाराबाबत सूचना दिल्या. मात्र कायदा सुव्यवस्था व नियम धुडकावून सुरू असलेला श्रद्धेचा बाजार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी लक्ष घालून बंद करावा अशी मागणी समाजातून होत आहे.

kavtheeakand-blast-news-case-against-seven-people-in-kavtheeakand-blast-case

नियमातून नियंत्रण आणणे आवश्यक :तहसीलदार

आतशबाजी करताना व त्याची दारू तयार करताना दिलेल्या नियम व अटी पाळून सुरक्षितता व काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र तरुणांकडून ही काळजी घेतली जात नाही. याचा त्रास ग्रामस्थांसह सर्वांना होतो. नियम व अटी घालून या हुल्लडबाजीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. असे मत तहसीलदार अतुल पाटोळे यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *