sangli news : राष्ट्रवादी गटनेतेपदी राजेश्वरी नाईक, तर पक्षप्रतोद स्नेहल मोरे यांची निवड : जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी वाकुर्डे बुद्रुक गटाच्या सदस्या राजेश्वरी रणधीर नाईक यांची तर पक्षप्रतोदपदी एरंडोली (ता. मिरज) गटाच्या स्नेहल उमेश मोरे व उपनेतेपदी विनायक मासाळ यांची निवड करण्यात आली.
sangli news : राष्ट्रवादी गटनेतेपदी राजेश्वरी नाईक, तर पक्षप्रतोद स्नेहल मोरे यांची निवड
जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून भूमिका जाहीर केली आहे. आमची भूमिका निर्णायक ठरणार असून सव्वा वर्ष अध्यक्षपदाच्या मागणीबाबत ठाम असल्याचा पुर्नरुच्चार राष्ट्रवादीच्यानेत्यांकडून शनिवारी करण्यात आला. कुणाला पाठींबा द्यायचा, याबाबत आम्ही लवकरच पक्षाच्या वरिष्ट नेत्यांना भेटणार असल्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितले.
मिरज येथील शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकार्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, तम्मणगौडा रवी पाटील, रणधीर नाईक यांच्यासह पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात फक्त वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. गटनेता, पक्षप्रतोद आदींच्या निवडीविषयी शिक्कामोर्तब करण्यात आले.
त्यानंतर सदस्यांची बैठक झाली. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत कोणाला पाठिंबा द्यायचा, याविषयी नवनिर्वाचित सदस्यांच्या भूमिका जाणून घेण्यात आल्या.तुम्ही घ्याल त्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत,अशी भूमिका सदस्यांनी स्पष्ट केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पक्षनेत्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जिल्ह्यातील घडामोडींची माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा बैठकीतील निर्णयाची माहिती देण्यासाठी भेट घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतील पक्षनेतेपदी शिराळ्याच्या राजेश्वरी रणधीर नाईक यांची निवड करण्यात आली. पक्षप्रतोद म्हणून एरंडोलीच्या स्नेहल उमेश मोरे आणि उपनेतापदी विनायक मारुती मासाळ यांच्या निवडी झाल्या. मिरज पंचायत समितीत मुख्य पक्ष प्रतोदपदी संयोगिता कोळी यांची निवड करण्यात आली.
दरम्यान गटनेता, पक्षप्रतोद, उपनेता निवडीचा अहवाल व या निवडीनंतर सत्तेत कोणासोबत जायचे याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले यांनी दिली. सोमवार दि. 2 रोजी जिल्हाधिकार्यांच्या समोर गटनेता निवडीबाबत नोंद करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सहा जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे. मात्र, सत्तेसाठी कोणला पाठिंबा द्यायचा याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सन्मान होईल त्यांनाच आपला पाठिंबा बैठकीत चर्चा झाली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आज बैठकीची शक्यता
जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या असून रविवारी काँग्रेस-शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांची सांगलीत बैठक होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत सत्ता स्थापन करण्याबाबतची चर्चा होणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











