sangli political news : हरिपूरच्या राजकारणात मोठा भूकंप, अशोक मोहिते भाजपच्या संपर्कात

SHARE:

sangli political news : हरिपूरच्या राजकारणात मोठा भूकंप, अशोक मोहिते भाजपच्या संपर्कात: मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि तीन वेळा पंचायत समिती सदस्य राहिलेले हरिपूरचे अशोक मोहिते हे आता भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी त्यांच्याशी सतत संपर्क साधला असून, मोहितेंनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

🔹sangli political news : हरिपूरच्या राजकारणात मोठा भूकंप, अशोक मोहिते भाजपच्या संपर्कात

 मोहिते घराण्याचा राजकीय वारसा

हरिपूरमध्ये गेल्या 50 वर्षांपासून मोहिते गटाची राजकीय पकड आहे.

  • अशोक मोहिते यांचे वडील दशरथ मोहिते दीर्घकाळ गावचे सरपंच राहिले.
  • त्यानंतर नामदेवराव मोहिते आणि अशोक मोहिते यांनी गटाची धुरा सांभाळली.
  • आता तिसरी पिढी राजकारणात दाखल झाली आहे.

दोन वेळा समडोळी, पंचायत समिती मतदारसंघातून व एकदा हरिपूर पंचायत समिती मतदारसंघातून अशोक मोहिते निवडून आले आहेत. समडोळी, हरिपूर, अंकली, धामणी परिसरात त्यांचा मजबूत गट आहे आणि त्यांना मानणारे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत.

🔹 राष्ट्रवादी (शरद पवार गटाला) मोठा धक्का

मोहिते जर भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. कारण हरिपूरमध्ये राजकारण गेल्या अनेक दशकांपासून मोहिते गट विरुद्ध बोन्द्रे गट अशा दोनच गटांवर फिरत आले आहे.

  • बोन्द्रे गटाचे नेते अरविंद तांबवेकर हे संजयकाका गटाशी जोडलेले आहेत.
  • मोहिते भाजपमध्ये गेले तरी या दोन गटांमध्ये मनोमिलन होण्याची शक्यता नाही.

🔹 सुधीर गाडगीळ यांना मोठा फायदा

अशोक मोहिते भाजपमध्ये प्रवेश केल्यास आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गोटाला थेट बळकटी मिळेल.
हरिपूरसारख्या महत्वाच्या गावात मोहिते गट भाजपच्या पाठीशी राहिला तर स्थानिक पातळीवर भाजपची पकड आणखी घट्ट होणार आहे.


👉 थोडक्यात सांगायचं झालं तर, हरिपूरचे राजकारण पुन्हा एकदा उलथापालथीच्या मार्गावर आहे.
मोहितेंचा भाजप प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्षांतर नसून, तो स्थानिक समीकरणांवर आणि आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम करणारा निर्णय ठरणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *