kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात राडा

SHARE:

kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात राडा  : गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी बस स्थानकावर भांडण करणार्‍या अकरा जणांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या बंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. सदरची घटना हि शुक्रवार दि. 05 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

kasbe digraj crime news : कसबेडिग्रजमध्ये पोलिसांसमोरच दोन गटात राडा

दोन्ही गटातील 11 जणांविरोधात गुन्हा दाखल.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये अभिजीत वसंत लवटे (34), प्रविण शिवाजी अपराध (29), नितीन वसंत अपराध (34), योगेश आप्पासो सायमोते (35), कल्पेश बाळू कांबळे (28), निलेश रामचंद्र शिंदे ( 25), प्रतिक प्रकाश भगत (24), मोन्टी स्वामीनाथ सिंग (27), आकाश स्वामीनाथ सिंग (25), रोहित युवराज चव्हाण ( 35), आणि निखील श्रीकांत कदम (24 सर्व रा. कसबे डिग्रज, ता. मिरज ) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कसबे डिग्रज बसस्थानक परिसरात दोन गट एकत्रित येऊन जोरजोरात भांडण करीत होते याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दोन गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलीस असतानाही त्यांचा देखत दोन गट एकमेकांना भिडले.

kasbe-digraj-crime-news-rallies-between-two-groups-in-front-of-the-police-in-kasbe-digraj

यावेळी मारहाण करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *