sangli stamp news : सांगलीत स्टँप विक्रीत घोटाळा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आंदोलन

SHARE:

sangli stamp news : सांगलीत स्टँप विक्रीत घोटाळा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आंदोलन : सांगलीत मनपा बाग कर्मचार्‍यांच्या नावावर 100 रूपयाचे स्टॅप विकत घेवून गैरवापर करणार्‍या स्टॅप व्हेंडरवर कारवाई करा, या मागणीसाठी शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.

sangli stamp news : सांगलीत स्टँप विक्रीत घोटाळा रजिस्ट्रार ऑफिसमध्ये आंदोलन

सांगलीतील एक कंत्राटदाराने महापालिकेच्या बाग कर्मचार्‍यांच्या नावावर शंभर स्टॅम्प खरेदी केल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. मुद्रांक विभागाचा बोगस कारभार या निमित्ताने उघड झाला आहे.

सांगलीत पुन्हा एकदा प्रशासनाच्या कारभाराचा बुरखा फाटला!

महापालिकेच्या बाग विभागातील तब्बल 100 कंत्राटी कर्मचार्‍यांच्या नावाने शंभर स्टॅम्प खरेदी करून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सांगलीतील सामजिक कार्यकर्ते कैलास पाटील यांनी सर्व बाग कर्मचार्‍यांनो घेवून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी त्यांनी संबंधीत स्टँप विक्रेत्यावर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केले.

यावेळी सर्व बाग कर्मचार्‍यांनी एका पायावर उभे राहून आंदोलन केले. तसेच महापुरुषांच्या फोटोंना अभिवादन करून – स्वातंत्र्यवीरांनो, आम्हाला माफ करा! असा भावनिक पवित्रा घेतला या प्रकरणानंतर संबंधीतांनी आंदोलनाची दखल घेवून याबाबत तात्काळ वरिष्ठांना याचा अहवाल देणार असल्याचे सांगितले.

सांगलीकरांचा सवाल

दरम्यान सर्वसामान्यांना 100 रूपयाच्या कामासाठी 500 रूपयाचे स्टॅप घ्यावे लागत आहे. 100 रूपयाचे स्टॅप मिळत नसल्याचे सांगत आहेत. पण आता या कंत्राटदाराला एवढे स्टॅप कसे मिळाले. स्टॅपचा साठा करून जादा दराने विक्री होत आहे काय असा सवालही या निमित्ताने होत आहे. तसेच स्ॅटप विकत घेताना संबंधीत ग्राहक हजर असावा लागतो. परंतु 100 स्टॅप विकताना स्टॅप विक्रेत्यांना हा नियम का पाळला नाही, असा सवालही यावेळी कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *