kolhapur khandpith news : कोल्हापुरात न्यायालयाच्या सर्किट बेंचचा विजयघोष! 40 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश,: कोल्हापूर: चार दशके झगडलेल्या स्वप्नाचे आज वास्तवात रूपांतर झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याला अखेर यश लाभले असून, शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी अधिकृत नोटिफिकेशन काढत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
kolhapur khandpith news : कोल्हापुरात न्यायालयाच्या सर्किट बेंचचा विजयघोष! 40 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश,
न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
कोल्हापुरातील वकिलांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने उभारलेला हा संघर्ष केवळ न्यायालयीन सुविधा मिळविण्यापुरता नव्हता, तर तो होता इथल्या मातीचा आवाज, इथल्या जनतेच्या हक्काचा लढा! आज या विजयाने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जल्लोषात न्हालाय. न्यायाच्या दिशेने उचललेले हे पाऊल आता सहा जिल्ह्यांच्या लोकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.
मुंबईची धावपळ आता इतिहासजमा
केवळ एक तारखेच्या सुनावणीसाठी पक्षकारांना आणि वकिलांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. वेळ, पैसा, श्रम आणि मानसिक त्रास यांच्या चक्रात अडकलेले कित्येक आयुष्यं आता सावरणार आहेत. कोल्हापुरातच सर्किट बेंच उपलब्ध झाल्यामुळे न्यायाच्या दारापर्यंत पोहोचणे आता अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे.
संघर्षातून साधलेले स्वप्न
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, वकिलांच्या धरणे आंदोलने, रस्त्यावरचे मोर्चे आणि अनेक राजकीय नेत्यांचे प्रयत्न – या सर्वांचे आज चीज झाले. विशेषतः, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नियुक्तीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकली आणि आज यशाचे द्वार खुले झाले.
स्थानिक अर्थव्यवस्थेलाही संजीवनी
सर्किट बेंचमुळे केवळ न्यायप्रक्रियेला चालना मिळणार नाही, तर कोल्हापूरसह आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि सामान्य नागरिक यांच्या आगमनाने स्थाकोल्हापुरात न्यायालयाच्या सर्किट बेंचचा विजयघोष! 40 वर्षांच्या संघर्षाला अखेर यश, न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
कोल्हापूर: चार दशके झगडलेल्या स्वप्नाचे आज वास्तवात रूपांतर झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचसाठी सुरू असलेल्या दीर्घ लढ्याला अखेर यश लाभले असून, शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी अधिकृत नोटिफिकेशन काढत या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
कोल्हापुरातील वकिलांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि जनतेने उभारलेला हा संघर्ष केवळ न्यायालयीन सुविधा मिळविण्यापुरता नव्हता, तर तो होता इथल्या मातीचा आवाज, इथल्या जनतेच्या हक्काचा लढा! आज या विजयाने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा जल्लोषात न्हालाय. न्यायाच्या दिशेने उचललेले हे पाऊल आता सहा जिल्ह्यांच्या लोकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे.
kolhapur-khandpith-news-victory-cry-of-the-circuit-bench-of-the-court-in-kolhapur-finally-success-after-40-years-of-struggle
मुंबईची धावपळ आता इतिहासजमा
केवळ एक तारखेच्या सुनावणीसाठी पक्षकारांना आणि वकिलांना शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. वेळ, पैसा, श्रम आणि मानसिक त्रास यांच्या चक्रात अडकलेले कित्येक आयुष्यं आता सावरणार आहेत. कोल्हापुरातच सर्किट बेंच उपलब्ध झाल्यामुळे न्यायाच्या दारापर्यंत पोहोचणे आता अधिक सुलभ आणि सोपे होणार आहे.
संघर्षातून साधलेले स्वप्न
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, विविध सामाजिक संघटना, वकिलांच्या धरणे आंदोलने, रस्त्यावरचे मोर्चे आणि अनेक राजकीय नेत्यांचे प्रयत्न – या सर्वांचे आज चीज झाले. विशेषतः, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नियुक्तीनंतर ही प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकली आणि आज यशाचे द्वार खुले झाले.
स्थानिक अर्थव्यवस्थेलाही संजीवनी
सर्किट बेंचमुळे केवळ न्यायप्रक्रियेला चालना मिळणार नाही, तर कोल्हापूरसह आजूबाजूच्या सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि सामान्य नागरिक यांच्या आगमनाने स्थानिक व्यापार, सेवा, हॉटेल व्यवसाय, वाहतूक क्षेत्र यालाही नवा उभारी मिळणार आहे. न्यायालय म्हणजे केवळ कायद्याचे केंद्र नसते, ते विकासाचेही गमक असते – हे कोल्हापूर आता अनुभवणार आहे.निक व्यापार, सेवा, हॉटेल व्यवसाय, वाहतूक क्षेत्र यालाही नवा उभारी मिळणार आहे. न्यायालय म्हणजे केवळ कायद्याचे केंद्र नसते, ते विकासाचेही गमक असते – हे कोल्हापूर आता अनुभवणार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.