sangli zp news : नव्या सीईओंचा 25 लेट लतिफांना दणका

SHARE:

दहा वाजता गेट बंद, समज देवून प्रवेश

sangli zp news : नव्या सीईओंचा 25 लेट लतिफांना दणका : जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दुसर्‍याच दिवशी मंगळवारी 25 लेट लतिफांना दणका दिला. दोन्ही प्रवेशद्वार दहा वाजता बंद करण्याची सूचना त्यांनी दिली. पहिलाच दिवस असल्याने समज देऊन प्रवेश देण्यात आला. मात्र बुधवारपासून कारवाईचा इशाराही सीईओ नरवाडे यांनी दिला आहे.

sangli zp news : नव्या सीईओंचा 25 लेट लतिफांना दणका

नवे सीईओ नरवाडे यांनी सोमवारी पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन कार्यालयीन वेळेत हजर रहा, कामे वेळेत करा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्वतः सीईओ पावणेदहाच्या अगोदर हजर होते. 10 वाजता दोन्ही प्रवेशद्वाराला कुलूप लावण्याची सूचना त्यांनी दिली. त्यामुळे उशिरा आलेल्या कर्मचार्‍यांची जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर गर्दी झाली. उद्यापासून वेळेत येतो, पण आता आत सोडा, अशी विनंती काहींनी केली. सव्वा दहाच्या सुमारास स्वतः सीईओ नरवाडे प्रवेश द्वारावर हजर झाले. उशिरा आलेल्या कर्मचार्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

खातेप्रमुख असो अथवा कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहिलेच पाहिले, अशा कडक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पहिल्याच दिवस असल्याने समज देतो उद्यापासून सुधारणा करा, अन्यथा कारवाई करणार, असा इशारा देऊन प्रवेशद्वार उघडण्यात आले.
सीईओ नरवाडे यांच्या दुसर्‍याच दिवशी उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना दणका दिल्याने झेडपीत दिवसभर चांगलीच चर्चा सुरू होती. उद्यापासून साडेनऊ वाजताच हजर राहू, अशीही कर्मचार्‍यांमध्ये बोलणे सुरू होते. तसेच खातेप्रमुखांमध्ये दबक्या आवाजात उलट-सुलट चर्चा सुरू होती.

कर्मचारी उशिरा येण्याची परंपरा कायम

जिल्हा परिषदेमध्ये नियमित आणि कंत्राटी कर्मचार्‍यांची संख्या 397 आहे. त्यापैकी 25 कर्मचारी मंगळवारी उशिरा आले. सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 अशी कर्मचार्‍यांची कार्यालयीन वेळ आहे. मात्र अनेक कर्मचारी अकरा वाजले तरी हजर नसतात. काही महिन्यांपूर्वी उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे उद्योग सुरू आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *