shirdhon accident news : शिरढोणजवळ अपघातात कोल्हापूरचे पती-पत्नी जागीच ठार

SHARE:

shirdhon accident news : शिरढोणजवळ अपघातात कोल्हापूरचे पती-पत्नी जागीच ठार : कोल्हापूरहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठी मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कोल्हापूर – कसबा बावडा येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. हा अपघात रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोण नजिक झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

shirdhon accident news : शिरढोणजवळ अपघातात कोल्हापूरचे पती-पत्नी जागीच ठार

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातील नामवंत वकील सौ. वंदना संतोष गायकवाड (वय 38 ) व पती संतोष धोंडीराम गायकवाड (वय 45) रा. कसबा बावडा, कोल्हापूर असे मृत झालेल्या व्यक्तींची नांवे आहेत.

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, संतोष गायकवाड हे पत्नी समवेत त्यांच्या मालकीच्या एम.एच.09/ एफ.जे.- 2815 क्रमांकाच्या व्हॅगनार कारने कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात होते. शिरढोण गावाजवळील उड्डाणपूलाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या नायरा पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्र. एम.एच.09/सी.जे.-2671 व त्याच्या दोन ट्रॉलींना त्यांच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.

ट्रॅक्टर चालक व कामगार चहा पिण्यासाठी जवळील हॉटेलमध्ये थांबले होते. धडक अत्यंत भीषण असल्याने कार ट्रॉलीखाली अडकली आणि कारमधील दोघांचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छे दनासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने यांचे स्विय सहाय्यक अमोल कोरे यांच्या तत्परते मुळे मृतांची ओळख पटविणे शक्य झाले. अमोल कोरे यांनी तत्काळ संपर्क साधल्याने पोलिसांना मोठी मदत मिळाली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *