tasgaon rain news : तासगाव तालुक्यात एकाच दिवसात 69.9 मिमी पाऊस

SHARE:

tasgaon rain news : तासगाव तालुक्यात एकाच दिवसात 69.9 मिमी पाऊस : शुक्रवारी दिवसभर आणि रात्रीनंतर शनिवारी सकाळपर्यत तासगाव शहरासह तालुक्यातील मंडलातील गावात अतिवृष्टी झाली आहे. 24 तासामध्ये तासगाव तालुक्यात तब्बल 69. 3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पावसामुळे ओढे-नाले भरुन वाहते झाले आहेत. येरळा आणि अग्रणी नद्यांना पूर आला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते. पावसाने काढण्याचा खरीप पाण्यात तर द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.

tasgaon rain news : तासगाव तालुक्यात एकाच दिवसात 69.9 मिमी पाऊस

अग्रणी – येरळा नद्यांना पूर ; ओढे – नाले तुडूंब, काढणीचा खरीप व द्राक्षबागा पाण्यात

शुक्रवारी सकाळपासून ते शनिवारी रात्रभर तासगाव शहर आणि तालुक्यातील सर्व मंडळातील गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीच ओढे आणि नाल्यांना पूर आलेला आहे.

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 26 तारखेपासून पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे काढणीला आलेला खरीप पाण्यात कुजत आहे. त्यातच शुक्रवारी दिवसभर व पाऊस सुरू असल्याने आगाप बागांवर डाऊनी व घडकुज होण्याची भिती आहे. यामुळे द्राक्षबागायतदार शेतकरी हवालदील झाला आहे. दुष्काळग्रस्त तासगाव तालुक्यात पावसाने ओला दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

शनिवारी पहाटेपासून तालुक्यातील तासगाव, सावळज, मणेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे मंडळातील सर्वच गावांना मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली तर अनेक गावांत विजेच्या तारा तुटल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला होता.

tasgaon-rain-news-69-9-mm-rain-in-a-single-day-in-tasgaon-taluka

तालुक्यातील सर्वच गावातील शेतात तुडूंब असे पाणी भरलेले दिसत आहे. पुर्व भागात द्राक्षबागांचे वाफे पाण्याने भरलेले आहेत. शेतकरी अस्मानी संकटाने हतबल झाला आहे.

तालुक्यात पडलेला मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटर मध्ये) मंडळ
………………………………..
तासगाव 53. 0 मिमी
मणेराजुरी 81. 0 मिमी
सावळज 74. 0 मिमी
विसापूर. 72. 2 मिमी
येळावी 73. 8 मिमी
मांजर्डे 69. 3 मिमी
वायफळे 66.0 मिमी
………………………………….
सरासरी 69. 9 मिमी

काढणीचा खरीप पाण्यात:

दुष्काळाने कायम पिचलेल्या पूर्व भागात धो धो बरसणार्‍या या पावसामुळे भूजल पातळी चांगली वाढली आहे. मात्र काढणीचा खरीप पाण्यात आहे. सोयाबीन, मका, ज्वारी, ,कडधान्ये, व द्राक्षबागा पाण्यात आहेत. पावसामुळे आगाप द्राक्षबागांवर डाऊनीचा मोठा प्रादुर्भाव होत घडकुज होणार आहे. काढणीला आलेली ज्वारी काळी पडण्याच्या मार्गावर आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *