येथील अजिंक्यतारा हाउसिंग सोसायटी येथून चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरणारी वृद्धा सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडली. प्रभा दत्तात्रय महाडिक (वय 68, रा. कोरेगावकर कॉलनी, पुलाची शिरोली, ता.करवीर) असे तिचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादी अनघा अनिल कुलकर्णी यांनी घरातील चांदीच्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती स्वच्छ करून बाहेर ठेवल्या होत्या. त्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने तपासयंत्रणा राबविली.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर फुटेजमध्ये संशयित महिला आढळून आली. जयसिंगपूर बसस्थानकावर या चांदीच्या वस्तू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर चांदीच्या मूर्ती मिळून आल्या. पोलिसांनी तिला अटक केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











