maharashtra chembar of commers news : ललित गांधींच्या मनमानी कारभाराला चपराक; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हडपण्याचा डाव उघड

SHARE:

maharashtra chembar of commers news : ललित गांधींच्या मनमानी कारभाराला चपराक; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हडपण्याचा डाव उघड : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या अध्यक्ष ललित गांधी यांनी संपूर्ण संस्थेवर एकहाती ताबा मिळवण्याचा डाव आखला होता. मात्र, जागरूक पदाधिकारी व सभासदांच्या वेळेवरच्या लक्षात आल्याने हा डाव पूर्णपणे फसला. नुकत्याच पार पडलेल्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये हा प्रकार उघड झाला.

maharashtra chembar of commers news : ललित गांधींच्या मनमानी कारभाराला चपराक; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स हडपण्याचा डाव उघड

या बैठकीत सभासदांना दिलेल्या घटनादुरुस्तीच्या मसुद्याची प्रत आणि प्रत्यक्ष सभेत मांडलेली प्रत यामध्ये मोठी तफावत आढळून आली. मूळ मसुद्यात फेरफार करून चुकीची मांडणी करण्यात आली होती. इतकंच नाही तर, नियमानुसार मसुदा किमान सात दिवस आधी पाठवणे गरजेचे असताना केवळ तीन दिवस आधीच तो पाठवण्यात आला. शब्दांचे खेळ, गोंधळात टाकणारी वाक्यरचना आणि पारदर्शकतेचा पूर्ण अभाव – यामुळे अनेक सदस्य संतप्त झाले.

घटनादुरुस्तीचा ड्राफ्ट थेट सभेत मांडल्याने त्यांच्यावर गंभीर आरोप

अध्यक्ष ललित गांधी यांनी मॅनेजिंग कमिटीला कोणतीही पूर्वसूचना न देता, घटनादुरुस्तीचा ड्राफ्ट थेट सभेत मांडल्याने त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. सभासद आणि मॅनेजिंग कमिटी सदस्यांनी या प्रकारावर जोरदार आक्षेप घेत, गांधी यांच्यावर संस्थेचा कारभार हडपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवला.

सभेत ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, मीनल मोहाडीकर, उमेश दशरती, रविंद्र माणगावे यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. सर्वांनी गांधी यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनादुरुस्तीची प्रक्रिया ठराविक टप्प्यांतूनच पार पडावी लागते –

विशेष समितीची स्थापना, मॅनेजिंग कमिटी व गव्हर्निंग कौन्सिलमधील चर्चा आणि शेवटी सभासदांकडून हरकती मागविणे – हे सर्व टप्पे डावलून गांधी यांनी थेट मसुदा सभेत आणला. ही संपूर्ण प्रक्रिया फसवणूक करून, संस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, मत्स्य कमिटी स्थापन करण्याच्या मागणीला गांधी यांनी सातत्याने विरोध केल्याचेही काही सभासदांनी निदर्शनास आणले. काहींनी तर सामाजिक भेदभाव आणि वैयक्तिक स्वार्थ साधल्याचा आरोप केला.

वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे आणि माजी अध्यक्षांनी पुढाकार घेत सभासदांच्या भावना ठामपणे मांडल्या. संस्थेची शंभर वर्षांची परंपरा आणि विश्वास टिकवण्यासाठी अध्यक्षांचा डाव हाणून पाडणं आवश्यक असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सभासदांचा सूर स्पष्ट होता – मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही. गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा सभासदच त्यांची हकालपट्टी करतील.

या सर्व गोंधळामुळे चेंबरच्या 98 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग तहकूब करावी लागली –

ही अतिशय गंभीर आणि लाजिरवाणी बाब ठरली. सभासदांमध्ये अस्वस्थता वाढली असून, संस्थेच्या आगामी नेतृत्वात मोठा बदल अपरिहार्य दिसत आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *