special news : चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या

SHARE:

special news : चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या : एखाद्या माणसाला नुसत्या मिर्च्या खायला सांगितल्या तर कुणीही पटकन तयार होणार नाही. तिखट पदार्थ आवडणारा व्यक्ती असेल तरीही तो फक्त मिरची खाईल का, याबाबत थोडीशी साशंकताच आहे. पण जर तुम्हाला असं सांगितलं की, एक लहान मुलगा एखादी भाजी किंवा काकडी-गाजर खावं तशा मिरच्या खातो तर…. तुम्हालाही हा विनोद वाटेल. पण सध्या एक व्हिडीओ होतोय, ज्यात एक छोटा मुलगा चक्क हिरव्या मिरच्या कचाकचा खाताना दिसतोय.

special news : चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या

व्हिडिओमध्ये मुलासमोर भात, डाळ, कांदे आणि मिरच्यांनी भरलेली प्लेट ठेवलेली दिसते आणि तो मुलगा आनंदाने मिरच्या खातो. सुरुवातीला असे वाटते की तो मुलगा मिरच्या फोडून फेकून देईल. पण तो मिरची खायला लागतो. तेव्हाही असे वाटते की फक्त एक चावा घेतल्यानंतर तो रडू लागेल. पण असे काहीही घडत नाही. तो मिरच्या फेकत नाही किंवा रडतही नाही. त्याऐवजी, तो चक्क कचाकचा मिरच्या खाऊ लागतो. या लहानशा मुलाच्या या कृत्याने सर्वांनाच आश्चर्यचकित आणि थक्क केले आहे. पाहा व्हिडीओ-

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 36 मिलियनपेक्षाही अधिक व्ह्यूज आहेत. तसेच 3 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईकदेखील केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, हे मूल भविष्यात सर्वात मोठे मिरची प्रेमी असेल. तर काहींनी अशी कमेंट केली आहे की, हा मुलगा मिरची नव्हे तर बीन्स खात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *