udgaon murdar news : उदगावमध्ये पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

SHARE:

udgaon murdar news : उदगावमध्ये पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप : उदगाव (ता.शिरोळ) येथील माधुरी सुर्यकांत शिंदे यांच्या खूनप्रकरणी जयसिंगपूर येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश जी. बी. गुरव यांनी पतीस जन्मठेप व 10 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास 2 वर्षे सक्तमजूरी अशी शिक्षा सुनावली. सुर्यकांत महादेव शिंदे असे आरोपीचे नाव आहे. 23 जून 2018 रोजी उंदगांव येथे ही खुनाची घटना घडली होती. सरकारी पक्षातर्फे ड. विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले.

udgaon murdar news : उदगावमध्ये पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 23 जून 2018 रोजी सुर्यकांत शिंदे याने त्याची पत्नी माधुरी हिच्यावर चारित्र्यावर संशय घेवून धारदार कुर्हाडीने डोक्यात, पाठीवर, खांद्यावर व हातावर वार करून तिचा खुन केला होता. यानंतर सुर्यकांत याच्याविरूध्द जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खूनप्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी तपास करून न्यायालयात सुर्यकांत शिंदे याच्याविरूध्द दोषारोपपत्र सन 2019 साली दाखल केले होते.

सदरचा खटला जयसिंगपूर येथील अति. सत्र न्यायालयात अति. जिल्हा व सत्र न्यायाधिश जी. बी. गुरव यांचेसमोर चालू होता. सदर खटल्याची सुनावनी दि.20 जानेवारी 2023 रोजी सुरू झाली व ती दि.12 सप्टेबर 2025 रोजी संपली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासले, त्यामध्ये पंच व इतर साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. खुनाच्या घटनेनंतर पती सुर्यकांत हा स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर झाला होता व गुन्हयाची कबुली दिली होती.

त्याची नोंद ठाणा डायरीस घेतली होती. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, उपनिरीक्षक किरण दिडवाघ, प्रभावती सावंत, सुकुमार गडकरी, तसेच आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे (बालसाक्षीदार) व मुलगी रेवा शिंदे फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. एस. पाटील यांची साक्ष महत्वाची ठरली.

Husband sentenced to life imprisonment for wife’s murder in Udgaon

या खटल्यात 14 साक्षीदारांचा पुरावा तसेच, अन्य कागदोपत्री पुरावा, सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांचा युक्तीवाद तसेच, शवविच्छेदन अहवाल व अन्य 6 घटनास्थळावरील पुरावे कोर्टाने ग्राहय धरले. तसेच बालसाक्षीदार शिवराज शिंदे हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याची साक्ष महत्वाची ठरली. त्याची साक्ष व अन्य पुरावे ग्राहय मानून न्यायालयाने पती सुर्यकांत यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे सक्तमजूरी अशी शिक्षा ठोठावली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *